मुंबई : राज्यसभेच्या तिसऱ्या जागेसाठी भाजपने राज्यसभेचे उमेदवार धनंजय महाडिक यांना उमेदवारी जाहीर केली आहे. ही जागा निवडून आणण्यासाठी भाजपाला १० मतांची गरज आहे. त्याची व्यवस्था राज्यातील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी करून ठेवली आहे, असा दावा महाडिक यांनी केला. भाजपच्या या तडजोडीमुळे शिवसेनेची डोकेदुखी वाढणार आहे.
“यावर शेंबडं पोर तरी विश्वास ठेवेल”? राऊतांच्या प्रश्नावर चंद्रकांत पाटलांचं जोरदार प्रत्युत्तर
राज्यसभेसाठी भाजपकडून केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, माजी कृषिमंत्री अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक यांना राज्यसभेसाठी उमेदवारी जाहीर केली आहे. त्यानंतर महाडिक यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी भाजपचाच उमदेवार निवडून येणार आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी भाजपला आणखी सुमारे १० मतांची आवश्यकता आहे. त्याची व्यवस्था आम्ही केलेली आहे. भाजप तिन्ही जागा बहुमताने जिंकून येणार , असा दावा महाडिक यांनी केला.
“सोमय्यांना ‘अनैतिक’, ‘आक्रस्ताळे’, ‘अजागळ’ सारखे ‘अ’ कारातील विशेषणे लागू पडतात”
महाविकास आघाडीच्या आमदारांमध्ये सध्या वाद पेटला असून निधी वाटपाच्या मुद्द्यावरून तिन्ही पक्षांमध्ये आरोप – प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. त्याचा फायदा राज्यसभेच्या निवडणुकीत आम्हाला होईल, असेही ते म्हणाले. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी १० मतांची गोळाबेरीज करून ठेवली आहे. त्यामुळे आमच्या तीन जागा सहज निवडून येतील, असेही धनंजय महाडिक म्हणाले.
“उद्धव ठाकरेंबाबत बोलताना भान ठेवा नाहीतर शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ”; सेनेचा सोमय्यांना इशारा
दरम्यान, राज्यसभा निवडणूक आता बिनविरोध होणार की नाही अशी शक्यता निर्माण झाली आहे. कारण राज्यसभेसाठी महाराष्ट्रातून एकूण 7 उमेदवार रिंगणार उतरले आहे. ३ जून रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख त्या दिवशी राज्यसभा निवडणूक बिनविरोध होणार की प्रत्यक्ष लढत होणार हे स्पष्ट होणार आहे.
“हे दोन पैशाचे पोस्टर अन् आमचं तीन लाखाचं पोस्टर”; एकाच मंदिरात राष्ट्रवादी आणि नवनीत राणा
राज्यसभा निवडणुकीत सहाव्या जागेसाठी शिवसेना विरुद्ध भाजप अशी प्रतिष्ठेची लढत होणार आहे. भाजपने तिसरा अतिरीक्त उमेदवार रिंगणात उतरवला आहे. तोही कोल्हापूरचे धनंजय महाडिक यांना. त्यामुळे शिवसेनेचे दुसरे उमेदवार कोल्हापूर जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्यात राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी आता प्रत्यक्ष मतदान होऊन निवडणुकीत दोघांपैकी कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागलंय. राज्यसभेच्या ६ जागापैकी २ जागा निवडून आणण्याची मतदान क्षमता भाजपकडे आहे.
Read also:
- अन् केंद्रीय मंत्र्यांनीच स्वत: च्या मुलाचा केला सत्कार; भावुक होऊन व्यासपीठावरच ढसाढसा रडले
- भाजप राज्यसभेच्या निवडणुकीतून तिसरा उमेदवार काढून घेणार ; जयंत पाटील
- “निवडणुक झाली तर स्वागत नाही तर डबल स्वागत”; राज्यसभेच्या निवडणुकीबाबत राऊतांचं सुचक वक्तव्य
- “काॅंग्रेसकडून प्रतापगढ़ींना राज्यसभेची उमेदवारी जाहीर”; पटोले म्हणाले, “कोणीही नाराज नाही”
- राज्यसभेसाठी भाजपने तिसरा उमेदवार म्हणून धनंजय महाडिकांची निवड का केली?.. वाचा सविस्तर..