मुंबई : कोरोना लसीच्या ग्लोबल टेंडरबाबत प्रश्न विचारणाऱ्या एका नेटकऱ्याला उत्तर देताना मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी ‘बाप’ काढला होता. यातच आता महालक्ष्मी येथील धोबीघाट भागातील शौचालयाच्या मुद्यावरून भाजप नेते आशिष शेलार यांनी पेडणेकर यांच्यावर निशाणा साधत ‘महापौरांना काही बोलायची भीती वाटते, त्या आमचा बाप काढतील’, असा जोरदार टोला लगावला आहे.
महालक्ष्मी येथील धोबीघाट भागातील शौचालयाच्या मालकी हक्कावरून शिवसेना, मनसे आणि भाजप या तीन पक्षांमध्ये संघर्ष तीव्र झाला आहे. या शौचालयाचं उद्घाटन महापौर किशोरी पेडणेकर आणि खासदार अरविंद सावंत यांनी 12 जून रोजी केलं आहे आणि शौचालय चालवायची जबाबदारी धोबी कल्याण वेल्फेयर सोसायटीला देण्यात आली आहे.
धोबी घाटातील सार्वजनिक शौचालय धोबी कल्याण आणि औद्योगिक विकास को-ऑप. सोसायटी लिमिटेड या नोंदणीकृत संस्था चालवत होती. पण नुतनीकरणाच्या नावावर या संस्थेकडून काढून घेण्यात आले. ही संस्था अल्पदरात ही सुविधा उपलब्ध करून देत असताना महपौरांनी आपल्या एका कार्यकर्त्याच्या संस्थेला हे काम देण्याचा घाट घाटला आहे. याबाबत स्थानिकांमध्ये प्रचंड असंतोष असल्याचे आशिष शेलार म्हणाले.
तसेच, बाबत पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्याशी आपण चर्चा केली असून पुन्हा याबाबत चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. पक्ष अभिनिवेश आणि अहंकारीपणा या दोन दुर्गुनांनी सध्या शिवसेना भरली आहे. लोकांची स्वच्छ्ता करणाऱ्या या लोकांचे काम काढून आपल्या लल्लूपंजूना दिले असल्याची टीका करत महापौरांना काही बोलायची भीती वाटते, नाहीतर त्या आमचा बाप काढतील, असा सणसणीत टोला त्यांनी पेडणेकरांना लगावला.
Read Also :
- गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी मुख्यमंत्री ठाकरेंचा मोठा निर्णय, केले ‘हे’ आवाहन
- ‘वेळ आली तर तुमच्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अंगावरही जाऊ’
- ‘परदेशातील काळ्या पैशांचा खरा आकडा नरेंद्र मोदींकडे होता’
- ‘पायी वारीबाबत सरकारने गांभीर्याने विचार करायला हवा होता’
- ‘मी राष्ट्रपती नियुक्त खासदार, चंद्रकांत पाटलांनी मला शिकवू नये’