मुंबई – मुंबई महापालिकेच्या सुमारे ८० सेवासुविधा व्हॉट्सअॅपवर एका संदेशाद्वारे मिळू शकणाऱ्या अपच्या उदघाट्न प्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपस्थिती दर्शविली. लोकाभिमुख अशा ‘व्हॉट्सअॅप चॅट बॉट’ या सुविधेचे परवा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी त्यांनी विरोधी पक्षावर सडकून टीका केली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले की, काम न करताही नुसतं बोलणारे लोक आपल्या इथं भरपूर आहेत. मात्र आमचा कारभार हा उघड आहे. आम्ही काही लपवत नाही. शेवटी ज्याचं त्याचं कामं बोलतं. केलेल्या कामावर शंका घेणारे अनेक आहेत, पण प्रश्न विचारायला अक्कल लागत नाही.”, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना सुनावले होते.
पुणे जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात? अजितदादा म्हणतात… मी आणि वळसे पाटील…
यानंतर विरोधी भारतीय जनता पक्षाकडून देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जशास तसे उत्तर देण्यात आले आहे. दरवर्षी ११४ टक्के नालेसफाई मुंबईमध्ये करण्यात येते मात्र तरीदेखील मुंबई का तुंबते ? मुंबई पालिका वर्षाला साडेचार हजार कोटी आणि पाच वर्षांमध्ये २ हजार ५०० कोटी खर्च करुन ही पालिकेच्या रुग्णालायत उंदराने डोळे कुरतडून रुग्ण कसाकाय दगावतो ? असा प्रश्न आमदार आशिष शेलार यांनी उपस्थित केला होता.
आता भारतीय जनता पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्र वाघ यांनी देखील मुख्यमंत्र्यांना काही गंभीर प्रश्न विचारले आहेत. राज्यात गेल्या काही वर्षांमध्ये २५ हजार महिला गायब झाल्या आहेत. रोज राज्यातील महिला, मुली यांना छेडछाडीच्या प्रसंगांना सामोरे जावे लागत आहे.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाचा उद्रेक; कडक निर्बंध लागणार? आज होणार निर्णय
कित्येक महिला, मुलींनी छेडछाडीला कंटाळून आत्महत्येचा पर्याय निवडला आहे. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून महिलांच्या सुरक्षेच्या बाबतीत एकही चकार शब्द निघालेला नाही. मुख्यमंत्री साहेब म्हणाले की प्रश्न विचारायला अक्कल लागते. मुख्यमंत्री साहेब प्रश्न विचारायला नाही तर ते सोडवायला अक्कल लागते असा टोला चित्र वाघ यांनी मारला आहे.
Read also:
- ठाण्यात खारेगाव रेल्वेच्या पुलाच्या कामाच्या श्रेयवादावरून राष्ट्रवादी-सेनेत जुंपली
- नागवडे सहकारी साखर कारखान्यात आमदार बबनराव पाचपुते गटाचा दारुण पराभव; राजेंद्र नागवडेंनी २१च्या २१ जागा जिंकल्या
- फडणवीसांचा एक मास्टरस्ट्रोक आणि महेश लांडगेंची गोव्यात एन्ट्री
- दुकानांवरील मराठी पाट्यांना केवळ भाजप समर्थकांचा विरोध; मंत्री नवाब मलिकांचा आरोप
- राज्याचे मुख्यमंत्री आदित्य ठाकरे साहेब; काय घडलं नेमकं…