मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुप्त भेटीनंतर आणि काँग्रेसने आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याच्या घेतलेल्या निर्णयानंतर, राज्यातील राजकारणाला वेग आला आहे. यानंतर आता, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्यात, पवारांच्या ६ जनपथ निवासस्थानी बैठक झाली. दुपारी १ च्या सुमारास सुरू झालेली ही बैठक, तब्बल ४ तास चालली असून, भाजपविरोधात एकत्र येऊन लढण्यासाठी, यूपीएच्या बॅनरखाली एकत्र न येता, राष्ट्रमंच या बॅनरखाली एकत्र येण्यावर, या बैठकीत चर्चा झाली असल्याचं समजतं आहे.
हे पण वाचा, मोदीं विरोधात ‘राष्ट्रमंच’च्या बॅनरखाली एकवटणार विरोधी पक्ष? पवारांनी उद्या बोलावली १५ पक्षांची बैठक
यूपीएला अपयश आल्याने, ‘राष्ट्रमंच’च्या बॅनरखाली काँग्रेस-भाजप विरोधी पक्ष एक आल्यास, भाजप आणि काँग्रेसला देखील धक्का देणं सोपं जाईल आणि या नव्या बॅनरच्या माध्यमातून देशभरातील जनतेला आकर्षित करणं सोपं जाईल, असं काही नेत्यांचं मत असल्याने, ‘राष्टमंच’ नावानं नवी आघाडी उघडण्यावर, या बैठकीत चर्चा झाली असल्याचं सांगण्यात येत आहे. आज दु. ४ वा. पवारांच्या निवासस्थानी या नवीन आघाडीच्या दृष्टीने एक महत्वाची बैठक होणार असून, बैठकीला १५-२० काँग्रेस-भाजप विरोधी पक्षांचे नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे.
हे पण वाचा, प्रशांत किशोर- शरद पवार यांच्यात खलबतं सुरु, राज्यात लवकरच राजकीय वादळ?
दरम्यान, यावरून भाजपने पवारांवर टीका केली असून, भाजपचे मुख्य प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्वीट करत, “शरद पवार यांच्या दिल्लीतील घरी बैठक 20 जण उपस्थित असणाऱ्यांची यादी पहाता संभाव्य आघाडी हा राजकारणात जनाधार गमावलेल्या नेत्यांचा केवळ बातमीत राहण्यापुरता केविलवाणा प्रयत्न असून एक नवा हास्यास्पद प्रयोग यापलीकडे त्यातून काही निष्पन्न होणार नाही”, असे ट्वीट करत त्यांनी शरद पवार व इतर नेत्यांवर टीका केली. तसेच, या बैठकीसाठी यशवंत सिंन्हा, पवन वर्मा, संजय सिंग, डी. राजा, फारुख अब्दुला, जस्टीस ए. पी. शाह, जावेद अखतर, के सी तुलसी, करन थापर, आशुतोष, माजीद मेमन, वंदना चव्हाण, एस वाय कुरेशी हे नेते उपस्थित असणार आहेत, असंही उपाध्ये यांनी ट्वीटद्वारे सांगितले.
1) यशवंत सिंन्हा
2) पवन वर्मा
3) संजय सिंग
4) डी.राजा
5) फारुख अब्दुला
6) जस्टीस ए. पी.शाह
7) जावेद अखतर
8) के सी तुलसी
9) करन थापर
10) आशुतोष
11)माजीद मेमन
12) वंदना चव्हाण
13) एस वाय कुरेशी (Former CEC)— Keshav Upadhye (@keshavupadhye) June 22, 2021
दुसरीकडे, या उद्याच्या बैठकीला काँग्रेसला आमंत्रित करण्यात आलं की नाही याबाबत काही कळालं नसून, त्यामुळे उद्याच्या बैठकीला काँग्रेस उपस्थित राहणार का? की कॉंग्रेस शिवाय एकत्र येऊन आगामी काळात निवडणूक लडहवली जाणार, आणि असे असेल तर कॉंग्रेस यावर नेमकी काय भूमिका घेणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. कारण, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही काँग्रेस महासचिव, राज्य प्रभारी आणि प्रदेशाध्यक्षांची २४ जूनला बैठक बोलावली आहे.
Read Also :
- महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार धोक्यात आलं आहे का? पृथ्वीराज चव्हाण म्हणाले…
- मंत्रीपद घेतलं म्हणजे सगळं बटण सारख व्यवस्थित होते असं नाही – बच्चू कडू
- साई रिसॅार्टचे मालक अनिल परबच! परबांच्या अडचणीत वाढ
- चद्रकांत पाटील म्हणाले; जयंतराव असा त्रास देणे तुम्हाला शोभत नाही
- शिवसेनेचा भाजपला दे धक्का; दहा नगरसेवक करणार शिवसेनेत प्रवेश