पुणे : आलं अंगावर तर ढकल केंद्रावर अशीच संजय राऊत यांची भूमिका असल्याचे म्हणत भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. एका वृत्तपत्राशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
केशव उपाध्ये म्हणाल की, वसेनेचे खासदार संजय राऊत हे कायमच भाजपाच्या प्रदेश आणि केंद्रीय नेतृत्वावर टीका करताना दिसतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या बहुतांश योजनांच्या विरोधात ते आपलं मत मांडतात.
करोनाकाळात राज्यातील विविध वर्गांची आर्थिक घडी विस्कटली असताना राज्य मदत देण्यास असमर्थ असल्याचे सांगत त्यांनी अनेकदा केंद्राकडे बोट दाखवलं आहे. आलं अंगावर तर ढकल केंद्रावर अशीच संजय राऊत यांची भूमिका आहे, असे म्हणत उपाध्ये यांनी राऊतांवर जोरदार हल्ला चढवला.
संजय राऊत यांच्या पुढाकाराने तयार झालेल्या या सरकारचे वैशिष्ट्येच‘आल अंगावर तर ढकल केंद्रावर’, ‘आल अंगावर तर ढकल भाजपवर हे आहे. या सरकारला स्वतःच कोणतंही धोरण नाही. ते कायमच स्वतःच्या अपयशाचे खापवर भाजपवर फोडत असतात, असेही ते म्हणाले.