वाशिम : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या ताफ्यावर वाशिममध्ये दगडफेक करण्यात आली आहे. शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या बालाजी पार्टीकल बोर्ड कारखान्यावर १०० कोटींच्या घोटाळ्याचे आरोप सोमय्यांनी केले होते, याची पाहणी करण्यासाठी ते वाशिम दौऱ्यावर निघाले होते.
अब्दुल सत्तार आणि माझे पैसे एकत्र करू म्हणावं, बघू कोण हरतं; रावसाहेब दानवेंचं ओपन चॅलेंज
सोमय्यांच्या ताफ्यावर शाईफेक करुन दगडफेक करण्यात आली. शिवसैनिकांनी ही दगडफेक केल्याचं सांगण्यात येत आहे. भावना गवळी यांच्या समर्थकांनी किरीट सोमय्या यांना काळे झेंडे दाखवत त्यांच्या ताफ्यावर दगडफेक केल्याचा आरोप आहे. किरीट सोमय्या हे या ठिकाणी न थांबताच निघून गेले. पोलिसांना मात्र परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लाठीचार्ज करावा लागला.
आता तरी देव आम्हाला पावणार का? १५ लाख देणार का? देव चोरला म्हणत राष्ट्रवादीचे आंदोलन
भाजप नेते किरीट सोमय्या आज वाशिम दौरा करणार असून दौऱ्यादरम्यान शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या रिसोड येथील बालाजी पार्टिकल बोर्ड कारख्यान्याला भेट देणार आहेत. या भेटीमुळे गवळी समर्थक आणि भाजप असा वाद पेटण्याची शक्यता आहे. भावना गवळी समर्थक आणि शिवसैनिकांनी राष्ट्रीय महामार्गाचे काम बंद पाडल्याचे आरोप केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पत्रीद्वारे मुख्यमंत्र्यांना केली होती त्या महामार्गाला सुद्धा सोमय्या भेट देणार आहेत.
Read Also :
- ‘आधी केलेले पाप धुवा, मगच आशीर्वाद मागा!’ राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेवर राष्ट्रवादीची टीका
- “माझ्या काही वाचनात आलं नाही, तो अतिशय स्थानिक प्रश्न”; संजय राऊतांची राणेंना टोलेबाजी
- बाळासाहेबांचं स्मारक दलदलीत, मी पुत्र असतो तर त्यांना इथे येऊच दिलं नसतं – नारायण राणे
- आमदार महेश लांडगेंचा “गनिमी कावा” : सांगलीत अखेर बारी झालीच; बैलागाडा शर्यतीचा लढा!
- “…तेव्हाच मी ईडीच्या चौकशीला सामोरे जाईन,” अनिल देशमुखांनी दिलं पहिल्यांदाच थेट उत्तर