मुंबई : भाजप आणि शिवसेना यांच्यातील राजकीय संघर्ष थांबता थांबेना झाला आहे. शिवसेनेवर टिका करण्याची कोणतीही संधी राणे कुटुंबीय सोडत नाहीत. मग ते केंद्रीय मंत्री नारायण राणे असो किंवा, नितेश राणे, निलेश राणे शिवसेनेवर प्रखरपणे तुटुन पडतात. अशातच आज नारायण राणे यांनी शिवसेनेवर टिका करताना एका कार्यक्रमात शिवसेनेचा उल्लेख म्याउ म्याउ केला आहे. तसेच त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर देखील निशाणा साधला आहे.
“पवार साहेब तुमचे डायरेक्ट दाऊद सोबत संबंध नाही ना?” नवाब मलिक प्रकरणांवरून निलेश राणेंचा तिखट सवाल
राज ठाकरे यांची काल पुण्यात दमदार राजकीय सभा पार पडली. यावेळी देखील राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यांबाबत पुर्नउच्चार काढला. तर औरंगजेबाच्या कबरीवरून देखील राज्य सरकारला धारेवर धरलं. याचाच धागा पकडत बाळासाहेबांची शिवसेना आता राहिली नसून शिवसेना आता बकरीसेना झाली असल्याची टिका नारायण राणे यांनी केली आहे. तसेच आता शिवसेनेत 56 आमदार असून लवकरच ते शिवसेनेला जय महाराष्ट्र बोलतील, असा घणाघात देखील त्यांनी केला.
नवाब मलिकांचा पाय आणखी खोलात; दाऊदच्या लोकांसोबत व्यवहार केल्याचा न्यायालयाचं निरीक्षण
देशातील भाजपची सत्ता पुढच्या 50 वर्षात कोणीही रोखू शकत नाही. त्यामुळे हिंदुत्वावादी आणि सगळ्यांना सोबत घेऊन चालणारा भाजप पक्ष आहे. तसेच हा पक्ष सध्या भारतातील लोकांना आत्मनिर्भर बनवत आहे. असंही त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे नारायण राणे यांनी केलेल्या जहरी टिकेवर शिवसेना काय प्रत्युत्तर देणार ? त्याकडे सध्या सगळयांचं लक्ष्य लागून राहिलं आहे.
जितेंद्र आव्हांडाचं एक ट्विट; अन् चार जणांवर कारवाईचा बडगा
दरम्यान, आगामी काही काळात महापालिकेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यासाठी राजकीय पक्ष जोरदार तयारी करताना दिसत आहे. महाविकास आघाडी एकत्रित लढणार आहे की नाही हा प्रश्न सध्या अनुत्तरित आहे. मात्र भाजप येणाऱ्या निवडणुकांमध्ये आघाडीला जोरदार टक्कर देण्याची शक्यता आहे.
Read also:
- “कोणत्याही अपक्षाला पाठिंबा देणार नाहीत, मग तो कुणीही असो”; राऊतांनी संभाजी राजेंना स्पष्ट सांगितले
- “पक्षात १२ वाजता या सांगून तुमची काय किंमत ठेवली? लाथ मारा त्या खासदारकीला”;
- संभाजीनगरचं नामंतर झालं, असं बोलणारा तु कोण? राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
- काॅंग्रेसला गळती, शिवसेनेला चिंता; नाना पटोले म्हणाले, ज्यांना बलिदानाची पार्श्वभूमी नाही त्यांच्याबद्दल..;
- अजून किती काळ नवाब मलिकांची पाठराखण करणार? राजीनामा घ्या; चंद्रकांत पाटील