मुंबई : मराठा समाजाच्या समितीच्या अध्यक्षपदावरुन अशोक चव्हाणांना हटवण्याची मागणी सातत्याने केली जात असून, आण्णासाहेब पाटील अर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्यानंतर आता भाजप नेते निलेश राणे यांनी देखील ही मागणी केली आहे.
मराठा आरक्षणाबाबत काही पक्षांकडून राजकीय षडयंत्र केलं जातंय. ज्यांना ओबीसी विरुद्ध मराठा असा वाद लावून त्याचा राजकीय फायदा उठवायचा आहे, असे वक्तव्य अशोक चव्हाण यांनी केले होते.
मराठा आरक्षणासाठी पहिली मागणी असली पाहिजे ती म्हणजे अशोक चव्हाणांना समितीतून बाहेर काढा. मी अनुभवातून सांगतो या व्यक्तीला काही कळत नाही. उद्धव ठाकरे प्रमाणे यांना पण सगळं आयतं मिळालं म्हणून विषय समजत नाहीत. ह्या पदावर हुशार व आक्रमक व्यक्तीची गरज आहे.https://t.co/pnZmrlp3pn
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) November 3, 2020
निलेश राणे यांनी ट्विट केले की, मराठा आरक्षणासाठी पहिली मागणी असली पाहिजे ती म्हणजे अशोक चव्हाणांना समितीतून बाहेर काढा. मी अनुभवातून सांगतो या व्यक्तीला काही कळत नाही.
उद्धव ठाकरेंप्रमाणे यांना पण सगळं आयतं मिळालं म्हणून विषय समजत नाहीत. या पदावर हुशार व आक्रमक व्यक्तीची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.