मुंबई – एसटी कामगारांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी एकूण २२ संघटनांच्या कृती समितीसोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सोमवारी बैठक घेतली. यावरून भाजप नेते राम कदम यांनी त्यांच्यावर निशाणा साधला. मुख्यमंत्री व प्रशासनातील अधिकारी नसताना पवार यांनी बैठक कशी घेतली? असा सवाल उपस्थित करत ही बैठक घटना बाह्य असल्याचा आरोप कदम यांनी केला.
एसटीचे राज्य शासनात विलीनीकरण करा; शिवसेनेच्या आणखी एका आमदाराचे मुख्यमंत्र्यांना पत्र
शरद पवार यांना मुख्यमंत्र्यांनी स्वतःचा चार्ज दिला आहे का ? आणि जर नाही तर ते संविधानाला डावलून मंत्री आणि अधिकाऱ्यांची बैठक कशी काय घेऊ शकतात? शरद पवारांना बैठका घ्यायचाच असतील तर मुख्यमंत्री त्यांना चार्ज का देत नाहीत ? केवळ एकच निदान माफक अपेक्षा, असे ट्विट करत कदम यांनी उद्धव ठाकरे आणि पवारांना टोला लगावला आहे.
आदरणीय डॉ बाबासाहेबांच्या संविधानाच्या नियमांचे तरी पालन करा . स्वतः च्या मनमर्जी प्रमाणे संविधान आणी घटनेचा या सरकारला अपमान करता येणार नाही, असेही कदम ट्विटमध्ये म्हणाले आहे.
गोव्यात काँग्रेसची महाविकास आघाडीतून एक्झिट? खासदार संजय राऊतांनी सांगितलं नकाराच कारण
माननीय शरद पवाराना मुख्यमंत्र्यांनी स्वतःचा चार्ज दिला आहे का ? आणी जर नाही तर ते घटनाबाह्य संविधानाला डावलून मंत्री आणी अधिकाऱ्यांची बैठक कशी काय घेऊ शकतात ? आणी शरद पवारांना बैठका घ्यायचाच असतील तर मुख्यमंत्री त्यांना चार्ज का देत नाहीत ? केवळ एकच निदान माफक अपेक्षा.. pic.twitter.com/bU4pcwHWVq
— Ram Kadam (@ramkadam) January 11, 2022
Read also:
- पुण्यात भाजपला धक्का, 18 नगरसेवक राष्ट्रवादीच्या गळाला?
- पवार साहेबांची अॅलर्जी कोणाला; भुजबळांचा पडळकरांना खडा सवाल
- पवारांच्या जिवावर राहण्यापेक्षा स्वत: जाऊन संप मिटवा, गोपीचंद पडळकरांचा अनिल परब यांना सल्ला
- राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला सुरूवात झाली आहे – राजेश टोपे
- पूलाच्या कामाला चतुराई दाखवली तशी रस्ता, खावटी योजनेचे पैसे, पोषण आहारालाही दाखवा – चित्रा वाघ