मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकार पडणार असल्यांच्या वक्तव्यांनी पुर्ण महाराष्ट्रमय झाला आहे. अशातच विरोधी पक्षांकडून सरकार पडणार असल्याचे सातत्याने सांगण्यात येत आहे. परंतु महाविकास आघाडीचं सरकार अजूनही स्थिर आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात देखील आता सरकार पडणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. अशातच आता भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मंत्री एकनाथ शिंदे यांना उद्देशून सरकार पडणार असल्याचं वक्तव्य केले आहे. त्यामुळे राज्यात एकच चर्चा सध्या सुरू आहे.
” दरेकरांवरील कारवाई सूडबुद्धीने नव्हे तर सडक्या बुद्धीने “; आशिष शेलारांचा राज्य सरकारवर घणाघात
आज अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पावर सुधीर मुनगंटीवार यांनी चौफेर फटकेबाजी करत टीका केली. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांना उद्देशून म्हणताना, एकनाथराव तुम्ही ती २५ आमदारांची यादी माझ्याकडे द्या. सरकार कसे बनवायचे, हे मी तुम्हाला सांगतो’ असं सांगितलं आहे. त्यामुळे राज्यात आता यांवर चर्चा सुरू आहे.
मलिकांचा राजीनामा घ्या; नाही तर ठाकरे-पवार सरकारने सरकारी जावई घोषीत करा: राम सातपुते
महाविकास आघाडी स्थापन झाल्यापासून सरकार पडणार असल्याचे विरोधी पक्षाकडून सातत्याने सांगण्यात येत आहे. कॉंग्रेसचे राज्यसभेचे खासदार कुमार केतकर यांनी देखील भाजपला टोला लगावत महाविकास आघाडी बद्दल वक्तव्य केले होते. त्यानंतर सगळीकडे कुमार केतकर यांच्या वक्तव्यांची चर्चा रंगली होती. त्यावरून देखील भाजपवर टीका झाली.
राज्यातील राजकारण सध्या विविध मुद्द्यावरून चांगलचं गाजत आहे. महाविकास आघाडीतील काही नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा लागला आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या कोठडीत देखील 14 दिवसांची वाढ करण्यात आली आहे. अशातच आता आगामी काळात महापालिकेच्या निवडणूका होऊ घातल्या आहेत. सध्या राज्यातील राजकारण बघता महाविकास आघाडीबाबत अनेक शंकाना ऊत आला आहे. त्यामुळे पुढे काय घडणार ते आता पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Read also:
- शेतकऱ्यांचा तळतळाट या सरकारला खाली खेचणार; वीजकापणीवरून माजी ऊर्जामंत्र्याचं वक्तव्य
- गावसकर, सचिन विराटसारखे दिग्गज संन्यास घेतात; मग काॅंग्रेसची धुरा नव्या नेतृत्वाकडे का नाही?
- महाविकास आघाडी सरकार झुकती है! बस झुकानेवाला चाहिए
- ” दरेकरांनी त्यांचं नाव बदलून दरोडेखोर ठेवावं”; नाना पटोलेंची दरेकरांवर जहरी टीका
- भाजपला ते आंदोलन भोवलं; भाजपच्या आमदारासह अन्य 23 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल