मुंबई : उद्धव ठाकरे यांनी पुढील 25 वर्ष शिवसेनेचाच मुख्यमंत्री राज्यात असला पाहिजे, त्यासाठी आपली सत्ता आहे. लोकांच्या आपल्याकडून अपेक्षा आहेत. त्यामुले शाखेत बसा, प्रत्येकाच्या समस्या ऐकून त्या सोडवा, असं म्हटलं होतं. त्यावर आता भाजप नेते अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.
“वजनदार ने हल्के को, बस हल्के से ही वजन से, कल हल्का कर दिया”
२५ वर्षे कशाला, २५० वर्षे म्हणा की. फक्त आधी राहिलेली २.५ वर्षे नीट पूर्ण करा म्हणजे मिळावली. आणि हो… जमल्यास तुम्हीही मंत्रालयात बसा, असं म्हणत अतुळ भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.
जवळपास 50 वकिलांनी घेतली राज ठाकरेंची भेट ! मशिदीवरील भोंगा प्रकरण
बीकेसी येथील सभेनंतर उद्धव ठाकरे यांनी जिल्हा प्रमुखांना वर्षा निवासस्थानी बोलवलं होतं. त्याठिकाणी त्यांनी जिल्हाप्रमुखांना गावागावात तसेच शहरात ज्या ज्या ठिकाणी सेना आहे. तिथे शिवसेनेत चांगलं काम करण्याचे आदेश दिलेत. पुढील 25 वर्ष हा शिवसेनेचाच राहिल, या दृष्टीकोना सगळ्यांनी काम करा असं उद्धव ठाकरे यांनी बैठकीत जिल्हा प्रमुखांना सांगितले. राज्यात सध्या आपली सत्ता आहे. लोकांकडून आपल्याला खुप अपेक्षा आहेत. प्रत्येक दिवशी शाखेत बसा. येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा समस्या दुर झाली पाहिजे. कुठल्याही अडचणी सुटता कामा नये. तसेच कुणाचंही अपेक्षाभंग करू नका असं उद्धव ठाकरे यांनी काल सांगितले.
दुसऱ्यांच्या वजनाबद्दल, व्यंगाबद्दल बोलता, मग कोणी म्याव म्याव आवाज काढला, तर वाईट का वाटलं?
दरम्यान, आगामी काही काळात महापालिकेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यासाठी राजकीय पक्ष जोरदार तयारी करताना दिसत आहेत. तसेच राज्यात सध्या राजकीय सभांचाही धडका सुरू आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा झाल्यानंतर लगेचच देवेंद्र फडणवीस यांची सभा पार पडली. तर येत्या काही दिवसात राज ठाकरे यांची देखील पुण्यात सभा होणार आहे.
Read also:
- आरोग्यमंत्र्यांनी दाखवली संवेदनशीलता; अपघातग्रस्तच्या मदतीला आले धावून; व्हिडीओ व्हायरल
- “जो बायकोचा होऊ शकला नाही तो महाराष्ट्राचा काय होणार”; उद्धव ठाकरेंवर सोमय्यांनी केली बोचरी टीका
- नेहमीप्रमाणे मुंबईला तुंबई म्हणून जागतिक स्तरावर बदनाम करणार का? नितेश राणेंचा तिखट सवाल
- ‘हाच देवेंद्र तुमच्या सत्तेचा बाबरी ढाचा पाडल्याशिवाय राहणार नाही’; फडणवीसांचे थेट आव्हान
- “उताराला लागलेली गाडी अन् वैफल्यग्रस्त विरोधी पक्ष नेत्याला ब्रेक लागणे कठीण”