पिंपरी चिंचवड : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार दोन दिवसांच्या पिंपरी चिंचवड दौऱ्यावर आहेत. शनिवारी राष्ट्रवादीच्या आजी-माजी नगरसेवकांची बैठक असून रविवारी मेळावा घेण्यात येणार आहे. खुद्द शरद पवार यांच्याकडून पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. त्यामुळे अनेक लोककार्यक्रम ते पार पाडत आहेत. याचवेळी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महापौर उषा ढोरे यांनी त्यांचे स्वागत करीत असताना पवारांच्या पाया पडून आशिवार्द घेतला. त्यामुळे पिंपरी चिंचवडमध्ये राजकीय तर्कवितर्कांना उधान आले आहे.
साखर कारखान्याचा संचालक झाल्यावर लग्न कसं जमलं? अजित पवारांनी सांगितला भन्नाट किस्सा!
आगामी पिंपरी-चिंचवड महापालिका येत्या फेब्रुवारीला होण्याची शक्यता आहे. त्या अनुशंगाने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शहरात लक्ष घातल्याचे दिसत आहे. याचवेळी महापौर उषा ढोरे ह्या भाजपच्या नगरसेविका असताना शरद पवारांचा आशिवार्द घेतल्याने उपस्थितांमध्ये तर्कवितर्क लढवायला सुरूवात झाली आहे.
गोपीनाथ मुंडेंनी माझ्या कानात कुर्रर्र केलंय, मेलो तरी ताईची साथ सोडणार नाही – महादेव जानकर
येत्या फेब्रुवारीला होणाऱ्या महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने पिंपरी चिंचवडमधील भाजपचे अनेक नगरसेवक राष्ट्रवीदीच्या संपर्कात असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांच्या पुर्वीच सांगितले होते. दरम्यान, भाजपचे नगरसेवकांबरोबर बोलनी झाली असून नवरात्रीनंतर त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश केला जाणार आहे, असा दावा पिंपरीचे राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी काही दिवसांपुर्वीच केला होता. त्यातच आता भाजपच्या महापौरांनीच शरद पवारांचा आशिर्वाद घेतल्याने राजकारण चांगलेच तापण्याची शक्यता दिसून येत आहे.
Read Also :
- उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करण्यात माझा किंचीत हात होता; शरद पवारांची दिली कबुली
- साहेब, राज्यातील विद्यार्थ्यांच्या वडिलांच्या स्वप्नांचा पण विचार करा ना – चित्रा वाघ
- एकतर हे वसुली सरकार नोकर भरती काढत नाही, काढली तर असा गोंधळ घालतं – गोपीचंद पडळकर
- शिवसेनेत असतो तर मुख्यमंत्री झालो असतो, पण…; छगन भुजबळ
- उद्धव ठाकरेंच्या मेव्हण्यांची बेनामी कंपन्यात गुंतवणूक? किरीट सोमय्यांच्या वक्तव्याने उलटसुलट चर्चांना उधान