बुलंदशहरमध्ये ज्या लोकांनी पोलीस अधिकाऱ्याची हत्या केली त्यांना अटक करण्यात आली. या आरोपींपैकी एक भाजपा नेता शिखर अग्रवाल याला सर्टिफिकेट देतानाचा फोटो व्हायरल झाला आहे. एका कार्यक्रमात अग्रवाल आरोपीला प्रमाणपत्र देत असल्याचे दिसत आहे.
पंतप्रधान जनकल्याणकारी योजनेअंतर्गत जागरूकता अभियान जिल्हा महामंत्री अग्रवाल याला बनवण्यात आले आहे. शिखर अग्रवाल हे पोलीस अधिकाऱ्याच्या हत्याकांडातील मुख्य आरोपीसोबत फोटोत दिसत आहेत. अग्रवाल याला एका कार्यक्रमास जिल्हा महामंत्री बनवण्यात आले.
हा कार्यक्रमात जिल्ह्याध्यक्ष मनीष सिसोदिया यांनी अग्रवाल याला आपल्या हातांनी प्रमाणपत्र दिले. त्याचा फोटो आणि व्हिडिओ देखील समोर आले आहेत.
जामिनावर तुरुंगाबाहेर आलेल्या शिखर अग्रवाल यांच्यासोबतच्या जिल्हाधिकारी सिसोदियांचे फोटो समोर आल्यानंतर आरोपी आणि त्या संघटनेसोबत काही संबंध राहिले नाहीत असे सिसोदिया म्हणाले. सिसोदिया म्हणाले, आज मला कळलं की शिखर अग्रवाल एका संस्थेचा पदाधिकारी आहे. त्यांनी मला पाहुणे म्हणून कार्यक्रमाला बोलावले. या संस्थेशी माझा काहीच संबंध नाही.