कोरोना काळात घरी बसून न राहता प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून ऐरोली विधानसभेचे आमदार गणेश नाईक कामाला लागले आहेत. कोरोनाच्या महामारीतून नवी मुंबईला मुक्त करण्यासाठी आमदार गणेश नाईक देखील मनपा प्रशासनासोबत मैदानात उतरले आहेत.
प्रशासनाकडे काम करण्याचे अधिकार असतील, तर ते काम कसं व्हावं, कुठे व्हावं, कसं करावं याबाबत गणेश नाईक सूचना करत आहेत. यासाठी ते दर आठवड्याला मनपा आयुक्तांची भेट घेऊन यासंबंधी आमदार गणेश नाईक चर्चा करणार आहे.
गणेश नाईक यांनी या आधीही आयुक्तांची भेट घेतली होती. मंगळवारी (28 जुलै) पुन्हा एकदा त्यांनी आयुक्तांची भेट घेत अनेक विषयांवर चर्चा केली. लवकरच कोरोनाची लस बाजारात येईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येतेय. त्यामुळे नवी मुंबई मनपाने जेव्हा बाजारात लस येईल तेव्हा त्वरित विकत घेऊन सामान्य नवी मुंबईकरांना उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी गणेश नाईक यांनी आयुक्तांकडे केली.