पुणे : पुण्यातील भाजप आमदाराने महिला अधिकाऱ्याला शिवीगाळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. भाजपचे पुणे केन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील कांबळे यांनी महापालिकेच्या एका वरिष्ठ महिला अधिकाऱ्याला अर्वाच्च भाषेत केलेली शिवीगाळ समोर आली आहे. या प्रकरणाची एक ऑडिओ क्लीप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही ऑडिओ क्लीप वर्षभराची असल्याचं बोललं जात आहे. मात्र, तरिही एखाद्या महिला आधिकाऱ्याला अशा शब्दात बोलणं कितपत योग्य आहे, असा सवाल नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे.
खड्ड्यांमुळे आम्हाला शिव्या खाव्या लागतात, रस्त्याची कामे नीट करा – एकनाथ शिंदे
महापालिकेची महिला आधिकारी आणि भाजप आमदार सुनील कांबळे यांच्यात झालेल्या संभाषणाची मोबाईलवरील ऑडिओ क्लिप तुफान व्हायरल झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला आधिकारी महापालिकेच्या ड्रेनेज विभागात कार्यरत आहेत. कामानिमित्त कार्यकर्त्याच्या मोबाईलवरुन कांबळे यांनी संपर्क केला. त्यावेळी संबंधित महिला अधिकाऱ्याने काही वरीष्ठ अधिकाऱ्यांची नावे घेत, त्यांची परवानगी घ्यावी लागेल असे स्पष्ट सांगितलं. त्यावर चिडलेल्या कांबळे यांनी या महिला अधिकाऱ्याला अगदी घाणेरड्या शब्दात शिवीगाळ केली. ही ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. अर्वाच्च भाषा ऐकून महिला आधिकाऱ्याने फोन पुन्हा कार्यकर्त्याकडे दिला. पण कांबळे यांनी कार्यकर्त्याला फोन स्पीकरवर ठेवायला सांगितला. अन् पुन्हा शिविगाळ केली. त्यानंतर काही इतर आधिकाऱ्यालाही शिविगाळ केली.
५ वर्ष नाही, हजार वर्षे तुम्ही सत्ता राखा, पण राज्यातील महिला…- सुधीर मुनगंटीवार आक्रमक
महिला आधिकारी आणि आमदार कांबळे यांच्यातील संभाषण आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. पुढील काही दिवसात पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका रंगणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर ही ऑडिओ क्लीप व्हायरल केल्याचं बोललं जात आहे.
Read Also :
- भाजपला पडली मोठी खिंडार: कर्डिले कट्टर समर्थकांचा मोठा फौजफाटा राष्ट्रवादीत दाखल
- बहुजनांच्या पोरांनी फक्त सतरंज्या उचलाव्यात, हीच यांची मानसिकता – गोपीचंद पडळकर
- ज्यांना-ज्यांना भिती वाटते, त्यांनी सरळ भाजपात जावे; छगन भुजबळांचा रोख कुणाकडे?
- कारखानदारांनो, साखर साखर करत राहिलात तर भीक मागायची वेळ येईल – नितीन गडकरी
- मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणाला बसणार; वैतागलेल्या संभाजीराजेंचा निर्णय