सामनाचे संपादक संजय राऊत यांनी शरद पवार यांची रोखठोक मुलाखत घेतली त्याचा पहिला भाग आज पर्सिसद्ध झाला या मुलाखतीत राऊत यांनी शरद पवारांना अनेक प्रश्न केले. या मुलाखतीवरून नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर खोचक टीका केली आहे.
“बाळासाहेब ठाकरे गर्दी खेचणारे (क्राऊड पूलर) होते. ब्रँड ठाकरे होते, पण ही ओळख सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी पुसली”, असे ट्वीट करत भाजप आमदार नितेश राणे यांनी संजय राऊतांवर टीका केली.
नितेश राणे म्हणाले, “लहानपणापासून सामनात केवळ बाळासाहेब ठाकरे यांच्या मॅरेथॉन मुलाखती आपल्याला माहिती आहेत. ही त्यांच्या समर्थकांसाठी आणि त्यांच्या विरोधक अशा दोघांसाठीही मेजवानी असायची. बाळासाहेब ठाकरे गर्दी खेचणारे नेते होते. अगदी शरद पवार ही हे मानायचे, मात्र, हीच ओळख (ब्रँड ठाकरे) सध्याच्या सामनाच्या संपादकांनी संपवली आहे.”
Since childhood we only knew Marathon Interviews of Balasaheb in Samna!It was like a feast 4 his followers as well as his political opponents!Even Pawarsaheb believed Brand Thackeray was the crowd puller!
Now Brand Thackeray is finished by his very own Editor!
SHAME!— nitesh rane (@NiteshNRane) July 11, 2020