मुंबई – आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष’ एकटा लढणार की युतीत? या प्रश्नावर उत्तर देताना बाळा मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी गुपित वाढवल आहे. येत्या काही दिवसात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत, त्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी शिवथीर्थ बंगल्यावर मनसेचे प्रमुख नेते आणि सरचिटणीस अशा प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर बाळा नांदगावकर यांनी माध्यमांशी बोलताना याबाबत लवकरच चांगली-वाईट बातमी मिळेल असे म्हटले आहे
सुरेश म्हात्रे यांनी बांधले हातावर घड्याळ; अजित पवारांच्या उपस्थितीत पार पडला पक्षप्रवेश सोहळा
बाळा नांदगावकर म्हणाले, आजच्या बैठकीत आगामी निवडणूका आणि राज ठाकरे यांचा महाराष्ट्र दौरा याबाबत चर्चा झाली. मुंबईबाबत पण चर्चा झाली. त्याबाबतही बैठकांचे आयोजन करण्यात येणार आहे. ६ डिसेंबरला पुण्यात एक छोटी बैठक आहे. त्यानंतर १४ डिसेंबर रोजी मराठवाड्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक औरंगाबादला होणार आहे. त्यानंतर १६ डिसेंबरला पुन्हा पुण्यात पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली जाणार आली आहे. तर, कोकणातील पदाधिकाऱ्यांची बैठक निश्चित आहे, मात्र अद्याप तारीख ठरलेली नाही. तसेच उत्तर महाराष्ट्राची बैठक जळगावला आणि विदर्भातील अमरावती, नागपूर विभागाचीही बैठक होणार आहे, असेही नांदगावकरांनी स्पष्ट केले.
मोठी बातमी: ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव; कर्नाटकमध्ये दोन रुग्ण सापडले
ते म्हणाले, आता पर्यंतच्या निवडणूका आम्ही एकला चलो रे याच भूमिकेतून लढवल्या आहेत. पुढे काय होईल हे माहित नाही. त्याबाबतचा अंतिम निर्णय राज ठाकरेच घेतील. पण सध्यातरी आमची भूमिका ही एकटा जीव सदाशिव अशीच आहे, त्यादृष्टीने तयारीही सुरु आहे. पण लवकरच आपल्याला काहीतरी चांगली वाईट बातमी मिळेल असे म्हणत नांदगावकर यांनी आगामी निवडणूकांमध्ये मनसे-भाजपची युती होणार की नाही याबाबत गुपित वाढवल आहे.
Read Also :
- जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी चर्चा खडसेंची, मात्र बाजी मारली गुलाबराव देवकरांनी
- वीज कनेक्शन जोडल्याशिवास कार्यालयातून उठणार नाही; भाजप आमदार श्वेता महाले आक्रमक
- किल्ले रायगडावर राष्ट्रपतींचे हेलिकॉप्टर उतरवू देणार नाही; राष्ट्रपतीच्या दौऱ्याला शिवप्रेमींचा कडाडून विरोध
- पवारांची नवी खेळी: सातारा बँकेच्या अध्यक्षपदाची माळ भाजप आमदार शिवेंद्रसिंहराजेंच्या गळ्यात?
- नगरमधल्या रुग्णांच्या मृत्यू प्रमाणपत्रावर मुख्यमंत्र्यांचा फोटो छापायचा? सुजय विखेंचा कोल्हेंना प्रश्न