पुणे – आगामी पुणे महापालिका निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. एकीकडे महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांमध्ये एकत्रित निवडणूक लढण्यावर संभ्रम असून, दुसरीकडे भाजप आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आतापासूनच मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. आज विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे दोन दिग्गज नेते पुण्यात आले आहेत. हे दोन्ही नेते दिवसभरात आपापल्या पदाधिकाऱ्यांचे आणि कार्यकर्त्यांचे मत जाणून घेऊन पुढील रणनीती आखणार आहे.
ओमिक्रॉनचं महाराष्ट्रात पाऊल; अकोला जिल्ह्यात जमावबंदी लागू
आगामी महापालिका निवडणुकीत भाजप-मनसे युतीच्या चर्चा काही दिवसांपासून सुरू आहेत. त्यातच मागच्या आठवड्यात देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंनी नव्याने बांधलेल्या शिवतीर्थावर जाऊन सदिच्छा भेट दिली होती. त्यानंतर युतीच्या चर्चेला बळ मिळाले होते. या दोन्ही नेत्यांच्या सदिच्छा भेटीनंतर राज ठाकरे यांनी पक्षातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी भाजपसोबत जाण्यावर सहमती दर्शवल्याची माहिती मिळाली होती. तसेच मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी तुम्हाला लवकरच गोड बातमी मिळेल असे म्हणत काही संकेतही दिले होते. त्यानंतर आज पुण्यात हे दोन्ही नेते आले असल्याने यांच्यात पुन्हा भेट होणार का? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.
भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळेंच्या अडचणीत वाढ; काँग्रेसच्या छोटू भोयर यांची निवडणुक आयोगाकडे तक्रार
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत केंद्रीय मंत्री नारायण राणे, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील पुण्यात आले आहेत. हे नेते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना निवडणुकीबाबत मार्गदर्शन करणार आहेत. तसेच भाजप-मनसे युतीबाबत मतही जाणून घेण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे राज ठाकरे सकाळपासूनच पक्षाच्या शहर कार्यालयात पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहे. आगामी महापालिका निवडणुकासंदर्भात आजी माजी नगरसेवक, शहरप्रमुख, राज्याचे उपाध्यक्ष, महत्वाच्या कार्यकर्त्यांसोबत ते सविस्तर चर्चा करुन मत जाणून घेतील.
Read Also :
- ओमायक्रॉनची चिंता वाढली: राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागणार? अजित पवार म्हणतात…
- देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्ध फौजदारी आरोप निश्चित; प्रतिज्ञापत्रात गुन्ह्यांची माहिती लपवल्याचे प्रकरण
- वीर सावरकरांबद्दल जो वाद झाला तो दुर्दैवी, त्यांना मराठी माणूस विसरू शकत नाही – शरद पवार
- एक बाई स्वातंत्र्याला भीक म्हणते आणि त्यावरती एकही साहित्यिक बोलत नाहीत – बाळासाहेब थोरात
- लोकप्रियतेमुळे नव्हे, तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमुळे तुम्ही खासदार; मोहितेंनी कोल्हेंना खडेबोल सुनावले