मुंबई : राष्ट्रवादीच्या कदमवकवस्ती गावच्या सरंपच गौरी गायकवाड यांना न्याय मिळवून देण्यसाठी भाजप प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी पुढाकार घेऊन, राज्य सरकारवर तसेच राष्ट्रवादीवर जोरदार हल्लाबोल केला होता. त्यांच्या या कृतीने, पक्षीय राजकारण बाजूला ठेऊन एका महिलेसाठी महिला उभी राहिल्याची, त्यातही भाजपची महिला राष्ट्रवादीच्या महिलेच्या पाठीमागे उभी राहिल्याची जास्त चर्चा झाली होती.
“भानगडी करणारेच सत्तेत होते, मग ईडी का कारवाई करेल?” भाजपाचं पवारांना प्रत्युत्तर
दरम्यान, असाच काहीसा प्रकार वर्ध्यात देखील आता उघडकीस आला असून, यावेळी भाजपचे वर्ध्याचे खासदार रामदास तडस यांच्या सुनेने न्यायासाठी राष्ट्रवादीचे दरवाजे ठोठावले आहेत. मदतीसाठी याचना करणारा त्यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. त्यात तडस यांच्या सुनेने कुटुंबियांवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. कुटुंबीयांकडून आपल्याला बेदम मारहाण होत असल्याचं त्यांनी व्हिडीओत म्हटलं आहे. या प्रकरणी अजूनही खासदार तडस किंवा त्यांच्या कुटुंबीयांकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
“OBC आरक्षणाशिवाय निवडणूका होय नयेत! पण…”, शरद पवारांनी केलं मोठं विधान
तसेच, या व्हिडिओत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकरांकडे मदतीची मागणी केली असून, रुपाली चाकणकर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन त्यांचा हा व्हिडीओ ट्विट देखील केला आहे. या व्हिडीओत खासदार तडस यांच्या स्नुषा सांगत आहेत की, “मी पूजा… रुपालीताई चाकणकर यांच्याकडे मदत मागतेय. माझ्या जीवाला धोका आहे इथे. मॅडम मला प्लीज येथून घेऊन चाल. मी विनंती करते.”
राज्यात कॉलेजेस कधी सुरू होणार? अखेर मुहूर्त ठरला! उदय सामंत यांची मोठी घोषणा
दरम्यान, ट्विटमध्ये चाकणकर यांनी म्हटलं आहे, “वर्धा भाजप खासदार रामदास तडस यांच्या सून यांना गेली अनेक दिवस हे तडस कुटूंब मारहाण करून अत्याचार करीत आहेत. पूजाचा आत्ताचा हा व्हिडीओ माझ्यापर्यंत आला, तातडीने पोलीस आयुक्तांशी संपर्क साधला आहे. माझ्या पदाधिकारी व पोलीस संरक्षणासाठी तातडीने पोलीस आयुक्तांशी संपर्क साधला आहे. माझ्या पदाधिकारी व पोलीस संरक्षणासाठी पोहचले आहेत. दुसरीकडे, हा व्हिडीओ समोर आल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.
Read Also :
- राज्यात पुन्हा कडक निर्बंध लागणार का? विजय वडेट्टीवारांचं दिलं स्पष्टीकरण
- भावना गवळींच्या ट्रस्टशी संबंधित दोघांना ईडीचे समन्स; मागितली १५ दिवसांची वेळ
- चंद्रकांत पाटलांनी महापालिका निवडणुकीचा शड्डू ठोकला; एकाच वेळी एक लाख कार्यकर्त्यांशी संवाद
- परमबीर सिंग यांच्या अडचणी वाढल्या, भ्रष्टाचारप्रकरणी जामीनपात्र वॉरंट जारी
- हिंदुत्वाला विरोध करणाऱ्या काँग्रेसशी हातमिळवणी करताना लाज वाटली नव्हती का? – प्रसाद लाड