भाजप नेते निलेश राणे यांनी ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमणुकीवरून राष्ट्रवादी काँग्रेसवर सडकून टीका केली आहे. प्रशासक म्हणून नेमणूक करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवारांकडून 11 हजार रुपये मागत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे. पुणे जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदिप गारटकर यांचे एक पत्र निलेश राणे यांनी ट्विट केले आहे.
काही पक्ष मिळेल तिथून पैसे खायला विसरत नाही. ११ हजार द्या आणि प्रशासक व्हा. जो पैसे देऊन प्रशासक झालाय तो पैसे कमवायला हाथ पाय तर मारणारच आणि स्वतःचंच चालवणार. आमचं म्हणणं हेच आहे की पक्षाचे कार्यकर्ते प्रशासक झाले की गावाची वाट लावणार. pic.twitter.com/PoRploEpko
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) July 15, 2020
निलेश राणे यांनी ट्विट केले की, काही पक्ष मिळेल तिथून पैसे खायला विसरत नाही. ११ हजार द्या आणि प्रशासक व्हा. जो पैसे देऊन प्रशासक झालाय तो पैसे कमवायला हाथ पाय तर मारणारच आणि स्वतःचंच चालवणार. आमचं म्हणणं हेच आहे की पक्षाचे कार्यकर्ते प्रशासक झाले की गावाची वाट लावणार., सोबतच त्यांनी पत्र देखील शेअर केले आहे.
दरम्यान, मुदत संपत असलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून थेट राजकीय कार्यकर्त्यांच्या नेमणुका करण्यासंदर्भातील निर्णय ग्रामविकास विभागाने जारी केला आहे. या संदर्भात भाजपने विरोधी भूमिका घेतली आहे. हा आदेश त्वरित मागे घ्यावा. हा आदेश लोकशाही परंपरांवर आघात करणारा आहे, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरेजी यांना पत्र पाठवून केली आहे.