मुंबई : एकीकडे राज्यात महामारीचे संकट गडद होत असताना, मुंबईसह महाराष्ट्रातील काही भागांत तौत्के चक्रीवादळाने मोठे नुकसान झाले आहे. या वादळामुळे अनेक ठिकाणी वीजपुरवठा विस्कळीत झाला असून, अगणित झाडं उन्मळून पडली आहेत, राज्याच्या वेगवेगळ्या भागांत कित्येक घरांच्या भिंतींची पडझड झाली आहे, तर चक्रीवादळाने राज्याच्या किनारपट्टी भागातील जिल्ह्यांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.
दरम्यान, मुंबईसोबतच अनेक उपनगरांमध्ये अद्यापही मुसळधार पावसानं थैमान घातलं असून, दोन दिवसांपासून इथे पाऊस सुरु आहे. यामुळे अनेक सखल भागांत पाणी साचल्याचं पाहायला मिळत आहे.
यावरून भाजप नेते निलेश राणे यांनी, पर्यावरण मंत्री आणि वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर ट्विट करून निशाणा साधला असून, वरळीतील एका भागाचा व्हिडीओ शेअर करत त्यांनी, “हे चित्र वरळी मतदार संघाचं आहे… वरळीकर विचारतायत तो ‘केम छो वरळी’ विचारणारा आमदार कुठे आहे??? ती मुंबई पॅटर्नची पतंग कुठे गेली??? एका पावसात वरळी पॅटर्न लोकांना दिसलं, सगळीकडे थुकपट्टी करून चालत नाही.” असा खोचक टोला त्यांनी आदित्य ठाकरेंना लगावला आहे.
हे चित्र वरळी मतदार संघाचं आहे… वरळीकर विचारतायत तो ‘केम छो वरळी’ विचारणारा आमदार कुठे आहे??? ती मुंबई पॅटर्नची पतंग कुठे गेली??? एका पावसात वरळी पॅटर्न लोकांना दिसलं, सगळीकडे थुकपट्टी करून चालत नाही. pic.twitter.com/f90KTRvObR
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) May 18, 2021
दुसरीकडे तौक्ते चक्रीवादळामुळे, राज्याच्या किनारपट्टी भागातील जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याने, नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याची मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष तसेच कोकण प्रभारी नसीम खान यांनी केली आहे. यासंदर्भातले पत्र नसीम खान यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना लिहिले असून, स्थानिक लोकांना राज्य सरकारने आर्थिक मदत देण्याची नितांत गरज असल्याची मागणी त्यांनी पत्रात केली आहे.
Read Also :
- केंद्राच्या खात भाव वाढीच्या निषेधार्थ राज्यात होणार, “टाळी-थाळी बजाव” आंदोलन
- ‘मी गोमूत्र पिते, त्यामुळे मला कोरोना झाला नाही’
- ‘कोव्हॅक्सिन’चा प्रकल्प विदर्भातून पुण्याला पळवला ? अजित पवार म्हणाले…
- ‘म्युकरमायकोसीस’ रुग्णांच्या औषधोपचारासाठी ३० कोटींचा निधी उपलब्ध, उपमुख्यमंत्र्यांची माहिती
- कुस्तीपटूच्या मृत्यू प्रकरणी ऑलिम्पकविजेता सुशील कुमार फरार, एक लाख रुपयांचे इनाम जाहीर