प्रतिनिधी / ओंकार गोरे
पुणे : पुणे आणि होर्डिंग्ज, त्या होर्डिंग्जची चर्चा आणि व्हायरल हे आता नवीन नाही. कारण, बॅनरबाजीवरुन पुणेकर नेहमीच चर्चेत असतात. मग, ते आय लव्ह यूचे बॅनेर असोत किंवा, पावसात भिजणाऱ्या शरद पवारांच्या छायाचित्राचे भिंतीवरील रंगकाम असो, पुण्यातील या बॅनरबाजीची चर्चा होतेच. त्यातच आता एकीकडे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी वाढदिवसानिमित्त कोरोनाचे गांभिर्य लक्षात घेवून बॅनरबाजी करू नका असे आवाहन केले असतानाच दुसरकीकडे त्यांच्याचे पुण्यातील पदाधिकारी चमकोगिरी करण्याचे स्टंट काही सोडत नसल्याचे चित्र आहे. कारण अवघ्या दोन दिवसावर फडणवीसांचा वाढदिवस येवून ठेपला असताना स्वत:;ची चमकोगिरी करण्यासाठी देवेंद्र फडणवीसांना चक्क पुण्याचे नवे शिल्पकारच घोषीत केले आहे. त्यामुळे, राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा संघर्ष पेटण्याची चिन्ह दिसून येत असतानाच दुसरीकडे पक्षश्रेष्ठी पदाधिकाऱ्यांवर काही कारवाई करणार का?, याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.
‘उठा उठा आषाढी आली, ‘स्वबळावर’ गाडी चालवत पंढरीला जायची वेळ आली’, सदाभाऊ खोतांची खोचक टीका
देवेंद्र फडणवीस यांचा जन्मदिन २२ जुलै रोजी असतो. यंदाही त्यांनी वाढदिवसानिमित्त बॅनरबाजी न करता, गरजूंना मदत करण्याचं आवाहन भाजपानं केलं आहे. तसेच भाजपाचे कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी यांनीही कुठेही वर्तमानपत्रात जाहिरात किंवा बॅनरबाजी न करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केलंय. असे असतानाच पुण्यात देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणारे बॅनर झळकले आहेत. शहरातील या होर्डिंग्जवर देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख नव्या पुण्याचे शिल्पकार, नेतृत्व नव्या महाराष्ट्राचे असा उल्लेख करण्यात आला आहे.
भाजपच्या पदाधिकाऱ्यांची चमकोगिरी
पुणे महापालिकेत भाजपची सत्ता आहे. त्यामुळे बॅनरबाजीत भाजपचे पदाधिकारी अव्वल स्थानी आहेत. यात शंका नाही. अनेकवेळा भाजपच्या पदाधिकाऱ्यानी चमकोगिरीसाठी बॅनरबाजी स्टंट केल्याचे पुणेकरांनी पाहिले आहे. त्यातच आता एकीकडे थेट फडणवीसांकडून आवाहन केले जात असताना दुसकरीकडे पुण्यातील पदाधिकाऱ्यांकडून जोरदार बॅनरबाजी करण्यात येत आहे. सत्ताधारी भाजपने आता तर हद्दच केली आहे. कारण देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवसाच्या बॅनरवर नवे शिल्पकार एवढेच नव्हे तर महापौर मुरली मोहोळ, शहराध्यक्ष जगदीश मुळीक, सत्तारुढ पक्षनेते गणेस बीडकर आणि माजी आमदार हेमंद रासने यांच्या प्रतिमेची चमकोगिरी करण्यात आली आहे. त्यामुळे पुण्यातील सत्ताधारी भाजपला सत्तेची मस्ती चढली आहे का?, सर्वसामान्य नागरिकांचे काही देणेघेणे राहिले नाही का?, असा सवाल पुणेकरांना पडू लागला आहे.
खरचं फडणवीस नव्या पुण्याचे शिल्पकार आहेत?
पुणे शहर हे आजही विद्येचे माहेरघर म्हणून संबोधले जाते. त्याचबरोबर सांस्कृतिक शहर, ऐतिहासिक परंपरा, दख्खनची राणी, शिक्षणाचे आगार, पूर्वेकडील ऑक्सफर्ड, आणि आता आयटी शहर अशा विशेषणांनी पुणे शहर फार पूर्वीपासून आजपर्यंत प्रसिद्ध आहे. शहराला फार मोठा इतिहास आहे. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये सावित्रीबाई फुले, महात्मा जोतिबा फुले, महर्षी अण्णासाहेब कर्वे, पंडिता रमाबाई, लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर यांसारख्या अनेक राजकारणी आणि समाजकारणी व्यक्तींनी शिक्षणाचा पाया रोवून पुणे शहराला भारतात एक आगळे वेगळे शैक्षणिक स्थान मिळवून दिले.
फडणवीसांचा खुलासा, भाजप हा नक्की ‘कुणाचा’ पक्ष? देशात मोदींच्या नेतृत्वाखाली ‘कुणाचे’ राज्य आहे?
त्याचबरोबर गेल्या कित्तेक वर्षापासून पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात राष्ट्रवादीची सत्ता होती. त्यामुळे अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या सत्ताधाऱ्यांनी पुण्याच्या विकासासाठी मोठी झटापट केली आहे. त्यातच आता बालेवाडीतील लाभलेल्या ऑलंपिकच्या इतिहासचे जगभर नाव गाजत आहे. हे चित्र एकीकडे असताना २०१७ मध्ये एकहाती सत्ता आलेल्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी अचानक देवेंद्र फडणवीस यांना नव्या पुण्याचे शिल्पकार बनवून टाकले. अगर फडणवीस शिल्पकार तर मग बाकीच्यांचे काय?, फडणवीसांच्या रुपात नव्याने पाहू इच्छित असणाऱ्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा शिल्पकार पुणेकर स्विकारणार का?, असे असेल तर राष्ट्रवादीच्या विकास कामांचे शिल्पकार कोण?, असे अनेक प्रश्न उपस्थित होवू लागले आहेत.
पदाधिकाऱ्यांवर कारवाई होणार का?
माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते श्री देवेंद्र फडणवीस यांचा २२ जुलै रोजी वाढदिवस आहे. यानिमित्ताने पक्षाचे कोणतेही नेते/कार्यकर्ते होर्डिंग, बॅनर लावणार नाहीत आणि वृत्तपत्रातून/ टीव्ही माध्यमातून जाहिराती प्रसिद्ध करणार नाहीत, असे आवाहन भारतीय जनता पक्षातर्फे करण्यात आल्याचे भाजपाचे कार्यालय सचिव मुकुंद कुळकर्णी यांनी कळविले आहे. कुळकर्णी यांच्याकडून विनंतीकरूनही महापौर मुरली मोहोळ, शहराध्यक्ष जगदीश मुळीक, सत्तारुढ पक्षनेते गणेस बीडकर आणि माजी आमदार हेमंद रासने यांनी विक्रमच मोडला आहे. त्यामुळे पदाधिकाऱ्यांच्या चमकोगिरीवर वरिष्ठ नेते कारवाई करणार का?, हे पहाणे महत्वाचे ठरणार आहे.
Read Also :
- ‘उठा उठा आषाढी आली, ‘स्वबळावर’ गाडी चालवत पंढरीला जायची वेळ आली’, सदाभाऊ खोतांची खोचक टीका
- …तेव्हाच मी ईडीसमोर येईन…गायब आणि नॉट रिचेबल असलेल्या देशमुखांनी केला मोठा खुलासा
- योगायोग की…? फडणवीस आणि अजित पवारांनी दिला वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर हा एकच संदेश
- काँग्रेसने परत छेडले शिवसेनेला? पृथ्वीराज चव्हाणांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली की स्तुती?
- एकनाथ खडसेंना मोठा धक्का! जावयावर ईडीने केली मोठी कारवाई