भारतीय जनता पक्षाने राज्यात संघटनात्मक बदल केले आहेत. काही दिवसांपुर्वीच भाजपने नवीन कार्यकारिणीची घोषणा केली होती. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र भाजपच्या नवनिर्वाचित कार्यकारिणीची बैठक होणार आहे.
जे पी नड्डा हे दिल्लीतून बैठकीत सहभागी होणार आहे. तर इतर नेते बैठकीला व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित राहतील.
नवीन कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर पहिल्यांदाच बैठक होणार आहे. राज्याच्या प्रमुख कार्यकारिणीत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासोबत 12 प्रदेश उपाध्यक्ष, 12 सेक्रेटरी, 6 जनरल सेक्रेटरी आणि 1 कोषाध्यक्ष आहेत. कार्यकारिणीचे सदस्य 69 असतील, तर निमंत्रित सदस्य 139 जण असतील. सर्व आमदार-खासदार कायम सदस्य असतात.