भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी आज पुणे पालिकेत कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली.
“अजित पवार हेडमास्तर आहेत, उद्धव ठाकरेंनी त्यांच्याकडून काहीतरी शिकावं”, असा सल्लाही चंद्रकांत पाटलांनी मुख्यमंत्र्यांना दिला.
“काही ठिकाणी अजित पवार मुख्यमंत्री, तर काही ठिकाणी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री. अजित पवार हेडमास्तर आहेत, म्हणून उद्धव ठाकरे यांनी अजित पवारांकडून काहीतरी शिकावं”, असा सल्ला चंद्रकांत पाटलांनी उद्धव ठाकरेंना दिला
“तिघे एकत्र येऊन लढा, भाजप त्याला घाबरत नाही आणि हे एकदा होऊन जाऊद्या. सरकारमध्ये ज्या कुरबुरी सुरु आहेत, त्या फक्त स्वतःच्या ताटात काहीतरी पाडून घेण्यासाठी सुरु आहेत”,असं म्हणत राज्यातील पुढील निवडणुका शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढवण्याबाबत सुरु असलेल्या चर्चांवर चंद्रकांत पाटलांही थेट महाविकास आघाडीला आव्हान दिलं आहे. ,