IMPIMP

“…आता तसं कुणी म्हटलं कि दुसरा चेहरा नजरेसमोर येतो,” चंद्रकांत पाटलांचं युतीबद्दल मोठं भाष्य

अमरावती : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज अमरावतीच्या जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना, प्रसार माध्यमांशी बोलताना, युतीबद्दल मोठे विधान केले आहे. तसेच त्यांनी, पुढील निवडणुकांत भाजपसोबत कोण असेल आणि कोण नसेल याबद्दल बोलताना, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर नाव न घेता सडकून जळजळीत टीका केली आहे. “काही जणांची स्थिती नाव मोठं आणि लक्षण खोटं अशी आहे. ५६ आमदार असताना मुख्यमंत्री झाले,” अशी जहाल टीका त्यांनी केली.

मराठा आरक्षणप्रश्नी संभाजीराजे घेणार राष्ट्रपतींची भेट; शिष्टमंडळात सर्वपक्षीय खासदारही

तसेच, काही पक्ष भाजपसोबत अत्यंत प्रामाणिकपणे काम करत आहेत. त्यात केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंच्या रिपब्लिकन पक्ष, विनायक मेटेंचा शिवसंग्राम, महादेव जानकरांचा राष्ट्रीय समाज पक्ष, सदाभाऊ खोतांचा रयत क्रांती संघटना यांचा समावेश आहे. याशिवाय NDA मध्ये आणखी काही छोटे पक्ष देखील सोबत आहेत. मात्र पाठीत खंजीर खुपसणारे असं म्हटलं की आधी एकाच नेत्याचा चेहरा समोर यायचा, आता आणखी एक दुसरा चेहरा नजरेसमोर येतो,” असा जोरदार हल्लाबोल त्यांनी ठाकरेंवर केला.

आगामी निवडणुकीत युती की महाविकास आघाडी? शरद पवारांनी आढावा बैठकीत केले चित्र स्पष्ट

यापुढे भाजप सगळ्या निवडणुका स्वबळावर लढवेल आणि एकट्याच्या जीवावर सत्ता आणेल. आम्हाला युतीत आता इतर कोणीही नको,” असं मोठं विधान त्यांनी युतीबद्दल केलं आहे. पंतप्रधानांच्या नावाने निवडून यायचं आणि मग उठता-बसता त्यांच्यावर टीका करायची. मोदी हे आमचे आई-बाप आहेत. तुमच्या आई-बापाला शिव्या दिलेलं तुम्हाला चालतं का,” असा तिखट सवाल त्यांनी टीकाकारांना केला आहे. त्यांच्या या टीकेमुळे आणि विधानामुळे आता युतीत शिवसेना सामील होण्याची आशा संपुष्टात आली आहे.

Read Also :

Total
0
Shares
Previous Article

मराठा आरक्षणप्रश्नी संभाजीराजे घेणार राष्ट्रपतींची भेट; शिष्टमंडळात सर्वपक्षीय खासदारही

Next Article

खडसेंच्या सह आणखी ३ जणांची नावे चर्चेत, कुणाचा पत्ता कट होणार? मुख्यमंत्री राज्यपालांच्या भेटीला

Related Posts
Total
0
Share