मुंबई : नगरमध्ये एका कार्यक्रमात बोलताना, राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी भाजप प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांच्यावर “चित्रा वाघ लाचखोर नवऱ्याची बायको, ही तुमची महाराष्ट्राला ओळख आहे. तुमचे पती लाच घेतल्याप्रकरणी अटकेत होते. त्यांची नार्को करा” असा जोरदार हल्लाबोल केला. त्यावर वाघ यांनी, “कोणत्याही टेस्ट करा, मी तयार आहे. बलात्काराच्या गुन्ह्यात अडकलेला हा ‘वाघावर’ भुंकतोय! मी कोल्हाकुत्र्यांना घाबरत नाही. मलाही तुमच्यातला दम बघायचा आहे,” असं आव्हान दिलं होतं.
चित्रा वाघ-मेहबूब शेख यांच्यात रंगले सोशल मीडियावर जोरदार शाब्दिक युद्ध
दरम्यान, आज चित्रा वाघ पुण्यातल्या वानवडी बलात्कार प्रकरणावर बोलताना ट्विट वरून राज्य सरकारवर टीका केली आहे. “आता तर अक्षरशः लाज आणली! पुण्यातल्या वानवडी येथील १४ वर्षीय लेकीवर अंगाचा थरकाप उडेल असा सामूहिक पाशवी अत्याचार झालाय. मुलीवर उपचार सुरु असून ती गंभीर आहे रिक्षाचालक तिला रिक्षातून नेतो काय पुढे ५-६ रिक्षा चालक पाशवी अत्याचार करतात २ रेल्वेचे कर्मचारीही त्यात सहभागी होतात,” असा संताप त्यांनी व्यक्त केला आहे.
“मलाही तुमच्यातला दम पाहायचंय,” चित्रा वाघ यांनी स्वीकारलं मेहबूब शेख यांचं आव्हान
तसेच, “आरोपींना पुणे पोलिसांनी अटकही केलीय राज्यात अत्याचारांची परिसीमा झालीये. एकीकडे गृहविभाचा काडीचाही वचक न राहिलेल्या आणि दुसरीकडे मेहबूब सारखे बलात्कारी मोकाट वावरत असल्याने आम्ही ही असेचं बाहेर येऊन फिरू शकतोयं हे निर्ढावलेपणं विकृतांना आलंय हे नक्की. मुख्यमंत्रीजी लक्ष द्या”, असं दुसरं ट्विट करत त्यांनी अप्रत्ययक्षपणे मेहबूब शेख यांच्यावर निशाणा साधला आहे.
आरोपींना @PuneCityPolice अटकही केलीय राज्यात अत्याचारांची परिसीमा झालीये
एकीकडे गृहविभाचा काडीचाही वचक न राहिलेल्या आणि दुसरीकडे मेहबूब सारखे बलात्कारी मोकाट वावरत असल्याने आम्ही ही असेचं बाहेर येऊन फिरू शकतोयं हे निर्ढावलेपणं विकृतांना आलंय हे नक्की@CMOMaharashtra जी लक्ष द्या— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) September 7, 2021
पुण्यातील वानवडीत अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या रेल्वेच्या दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं असून, १४ वर्षीय मुलीचं पुणे रेल्वे स्थानक परिसरातून अपहरण करुन त्यांनी आणि काही रिक्षा चालकांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा खळबळजनक प्रकार नुकताच उघडकीस आला. या प्रकरणात एकूण आठ आरोपींना पुणे पोलिसांनी अटक केली आहे.
Read Also :
- “सगळ्या दुरुस्त्या केल्या जातील”, ईडीच्या कारवाईवरून पवारांचा सूचक इशारा
- मराठवाड्यात पावसाचे थैमान : परभणीत पुराच्या पाण्यात बैलजोडी गेली वाहून
- “ते कुठले डॉक्टर तपासावं लागेल,” मोहन भागवतांच्या विधानावर पटोलेंची टीका
- बार सुरू होतात तर मग मंदिरांना प्रोटोकॉल नाहीत का? भारती पवार
- ‘या’ ५ जिल्ह्यांना तिसऱ्या लाटेचा सर्वाधिक धोका, आरोग्यमंत्र्यांनी दिला सतर्कतेचा इशारा