मुंबई : भाजप अंधेरी पूर्व मतदारसंघातून विधानसभेची जागा लढवणार असल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेनेचे आमदार रमेश लटकेंच्या निधनामुळे जागा रिक्त झाली होती. या जागेसाठी आता भाजपकडून मुरजी पटेल यांना उमेदवारी देण्यात येणार आहे अशी माहिती मिळत आहे. गेल्या वेळी पराभव पत्कारलेली भाजपला यावेळी तरी हा मतदारसंघ पारड्यात पडणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचे 12 मे ला दुबईत ह्रद्यविकाराच्या झटक्यानेे निधन झालं होतं. त्यामुळे ही जागा रिक्त आहे. त्यामुळे या जागेसाठी पोटनिवडणूक लवकरच होणार आहे. भाजप या मतदारसंघातून मुरजी पटेल यांना उमेदवारी देण्यात येणार आहे अशी चर्चा सुरू आहे. तर शिवसेनेकडून लटके यांच्या पत्नीला उमेदवारी देण्यात आली आहे.
“शहाजी पाटलांनी माझ्याकडे यावं, त्यांना मातोश्रीवर चांगली खुर्ची देतो”
2012 मध्ये काँग्रेसमधून मुरजी पटेल यांची पत्नी केसरवबेन मुरजी पटेल नगरसेविका म्हणून निवडून आल्या. 2015-2016 मध्ये पटेल यांनी पत्नी सोबत भाजपमध्ये प्रवेश केला. 2017 ला मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजपच्या वॉर्ड 81 मधुन पटेल नगरसेवक म्हणुन निवडून आले, तर वॉर्ड 76 मधुन त्यांची पत्नी निवडून आली.
“सांग सांग भोलानाथ हा बालिश प्रश्न शेलारांनी मुनगंटीवारांना विचारला पाहिजे”; सेनेचं प्रत्युत्तर
2018 मध्ये खोट्या जात प्रमाणपत्रामुळे दोघांचेही नगरसेवक पद रद्द झालं. 2019 विधानसभा निवडणुकूत भाजप आणि शिवसेनेची युती झाल्यामुळे शिवसेनेचे उमेदवार रमेश लटके यांना अंधेरी मधुन तिकीट मिळालं. त्यावेळी मुरजी पटेल अपक्ष म्हणुन निवडणूकीत उभे राहिले. या मध्ये 16,964 मतांनी रमेश लटके विजयी झाले. पटेल यांचं फडणवीसांच्या जवळचे नाते असल्याने त्यांना भाजपकडून उत्तर पश्चिम जिल्ह्याचे महामंत्री पद देण्यात आले, अशी मुरजी पटेल यांची राजकीय कारकिर्द आहे.
Read also
- शिंदेंच्या बंडखोरीनंतर मोठा राजकीय भुंकप..! माजी मुख्यमंत्र्यांसह काॅंग्रेसचे 8 आमदार करणार भाजपमध्ये प्रवेश
- “राज्यात उलटा प्रवास सुरु होणं हे चांगलं लक्षण नाही?”; राज ठाकरेंनी शिंदे सरकारला फटकारलं
- संजय शिरसाठांना पुन्हा एकदा डावललं..! शिंदे गटाच्या नियुक्त्या जाहीर
- “हे सरकार हार-तुरे अन् उत्सवांमध्ये व्यस्त, विरोधकही काही बोलत नाहीत”; राजू शेट्टी आक्रमक
- “पोलीस ठाण्यात जाऊन माझं काम मी इमानदारीनं केलंय”; नवनीत राणा