मुंबई – राज्यात सध्या मशिदीवरील भोंगे, हनुमान चालीसा, हिंदुत्वाचा मुद्दा उपस्थित करत विरोधकांकडून राज्य सरकारवर टीकाकरण चालू आहे. या मुद्द्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ८ जूनला औरंगाबादमध्ये सभा होणार आहे. या सभेतून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विरोधकांना उत्तर देणार आहेत. औरंगाबादमध्ये राज ठाकरेंचीही सभा पार पडली असल्याने यानिमित्तानेही निशाणा साधला जात आहे. दरम्यान भाजपाने या सभेच्या निमित्ताने पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.
” केंद्र सरकारने वेळीच धडा घेतला नाही तर महागाईचा भस्मासूर उग्र रूप धारण करेल”
भाजपाकडून नेहमीच शरद पवारांच्या हातात सरकारचा रिमोट कंट्रोल असल्याची टीका केली जात असते. पडद्यामागून शऱद पवारच सरकार चालवतात असा दावा नेहमीच विरोधकांकडून केला जात असतो. त्यातच आता उद्धव ठाकरेंच्या सभेच्या पार्श्वभूमीवर भाजपाने पुन्हा एकदा टीका केली आहे.
भाजप नेते गणेश नाईक म्हणाले, हे प्रकरण संपल्यानंतर मी..; बलात्कार प्रकरण त्यांना भोवलं
भाजपाने ट्विटरला उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचं व्यंगचित्र शेअर केलं आहे. या व्यंगचित्रात उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यासमोर टीव्ही दाखवण्यात आला असून त्यावर “हिंदुत्वाचा खरा विचार ऐकण्यासाठी आलंच पाहिजे” अशी बातमी सुरु आहे. तर दुसरीकडे शरद पवार उद्धव ठाकरेंना स्क्रिप्ट व्यवस्थित पाठ कर सांगत असून त्यावर ते होय साहेब असं उत्तर देत असताना दाखवलं आहे. या व्यंगचित्रातून उद्धव ठाकरेंच्या तोंडी शरद पवारांची भाषा असते असं दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे… pic.twitter.com/2nwkessBdG
— BJP Mumbai (@BJP4Mumbai) May 12, 2022
Read also:
- “संजय राऊतांमध्ये कादर खान घुसलाय, हा रोजचा तमाशा बंद करा”
- राज्यसभेच्या 6 खासदारांसाठी निवडणुक जाहीर; राऊत, गोयल, पटेल यांना मिळणार पुन्हा संधी?
- राष्ट्रवादीत इनकमिंगचा धडाका; विविध पक्षातील नेत्यांनी बांधले घड्याळ
- ‘राज ठाकरे असुरक्षित? राज ठाकरेंना तात्काळ संरक्षण द्या’; मिलिंद एकबोटे यांची मागणी
- “संजय राऊत चिरकूट माणूस… त्यांना मुंगीही धमकी देणार नाही…”; मनसेने केली टिंगल