मुंबई – महाराष्ट्रात राज्यसभेच्या निवडणुकीत सहाव्या जागेसाठी चांगलीच मोर्चेबांधणी सुरु आहे. महाराष्ट्रातून निवडून द्यावयाच्या सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात असल्याने ही निवडणूक चुरशीची झाली आहे
“जीएसटीचे पैसे पेट्रोल, डिझेल कर कपातीसाठी आले नाहीत”; अजित पवारांनी भाजपच्या नेत्यांना सुनावलं
या निवडणुकीसाठी पहिल्या पसंतीच्या क्रमाची 42 मते विजयासाठी आवश्यक आहेत. भाजपची अधिकृत अशी 106 मते आहेत. विजयी मतांच्या कोट्यानुसार भाजपचे दोन उमेदवार सहज निवडून येऊ शकतात. भाजपकडे जादा 22 मते शिल्लक राहतात. या मतांच्या आधारावर भाजपने धनंजय महाडिक यांना तिसरा उमेदवार म्हणून रिंगणात उतरविले आहे.
लोकसभेच्या मैदानात नवनीत राणांविरोधात प्रणिती शिंदे उतरणार?
भाजपला राजेंद्र राऊत, प्रकाश आवाडे, रवी राणा याशिवाय रासपचे रत्नाकर गुट्टे, जनसुराज्यचे विनय कोरे, गोंदियाचे विनोद अगरवाल, उरणचे महेश बालदी अशा सात आमदारांनी पाठिंबा दिला आहे. यात आणखी तीन मतांची भर पडल्याचे आता दिसून येत आहे. भाजपकडे 32 जादा मते आता तयार असल्याचा दावा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला.
भाजपाची ताकद वाढवण्यासाठी गिरीश महाजन मैदानात; शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश
ते म्हणाले की, भाजपाचे तीन राज्यसभा सदस्य निवृत्त होत असल्याने पक्षाने तीन उमेदवार निवडणुकीस उभे केले आहेत. भाजपाच्या संख्याबळानुसार दोन उमेदवार सहज निवडून येतात व त्याखेरीज तिसऱ्या उमेदवारासाठी आमच्याकडे पहिल्या पसंतीची ३२ जादा मते आहेत. त्यामुळे या जागेसाठी आमचाच दावा आहे. महाविकास आघाडीकडे किती जास्त मते आहेत, हे त्यांनी सांगावे.
Read also:
- आधी पटोले आता चव्हाणांचा ठाकरेंवर वार; काँग्रेसला चांगली वागणूक मिळत नसल्याचा आरोप
- “ऑपरेशन करायला गेेले अन् कोरोना झाला;” अजित पवारांचा राज ठाकरेंना टोला
- “राज्यसभेच्या निवडणुकीसारखं, विधान परिषदेच्या निवडणुकीतही ‘भाजप’ आघाडीला रडवणार”
- भाजपचे महाडिक विजयी होणार, आणि महाविकासआघाडीचा बडा नेता घरी बसणार
- राज्यसभा निवडणूकिसाठी फडणवीसांची मोर्चेबांधणी, अपक्ष आमदरांना गळाला लावणार?