दूध दराच्या प्रश्नावर भाजप राजकारण करत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी बैठका झाल्या आहेत. भाजपने राज्य सरकारची काळजी करू नये, असे रोहित पवार म्हणाले.
नगर येथील जिल्ह्या रुग्णालयाला भेट देऊन त्यांनी कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, केंद्र सरकारने राज्यामध्ये 15 हजार टन दूध पावडर आयात केली, त्याबद्दल भाजप बोलत नाही, इंधन दरवाढीबद्दल शांत आहे. भाजपने याविरोधात आंदोलन करावे.
रोहित पवार म्हणाले की, राज्य सरकार लवकरच याबाबत धोरण ठरवणार आहे. मात्र, विषय मार्गी लागत असल्याचे दिसताच भाजप आंदोलन पुकारते.