– निवडणुकीत राष्ट्रवादीची कोंडी, पक्षश्रेष्ठी दखल घेणार का?
पिंपरी चिंचवड : पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतील प्रस्थापित आणि आत्मकेंद्री नेत्यांमुळे सत्ताधारी भाजपाचा प्रभाग रचनेत वरचष्मा राहिला आहे. चार-पाच प्रभाग वगळता संपूर्ण शहरातील प्रभाग रचना राष्ट्रवादीतील हस्तकांमार्फत भाजपाच्या दोन्ही आमदारांनी आपल्या मनाप्रमाणे करुन घेतल्यामुळे आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
“संजय” ला आता दिव्यदृष्टी प्राप्त झाली का? मनसेची राऊतांवर खोचक टीका
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने प्रभाग रचना जाहीर केली. तीन सदस्यीय प्रभाग पद्धती डोळ्यांसमोर ठेवून प्रभाग रचना करण्यात आली. यामध्ये महापालिकेतील सत्ताधारी भाजपाच्या आमदारांनी आपल्या राष्ट्रवादीतील हस्तकांमार्फत आपल्याला ‘हवे तसे’ प्रभाग बनवले आहेत, अशी चर्चा आहे.
खुलेआम वाईन विक्रीतून सरकार नेमकं काय साध्य करणार? अण्णा हजारेंचा सवाल
दुसरीकडे, दोन्ही आमदारांनी सदर प्रभाग रचना भाजपासाठी अनुकूल असल्याचा दावाही केला आहे. त्यामुळे राज्यात सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीसह महाविकास आघाडीला काय हासील झाले? असा प्रश्न राष्ट्रवादीसह शिवसेना आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमधून उपस्थित केला जात आहे. पिंपरी-चिंचवड शहराचे राजकारण, गावकी-भावकी, नातेवाईक, गाववाला- बाहेरचा अशा मुद्यांवर चालते. ‘दिल दोस्ती दुनियादारी’हासुद्धा शहराच्या राजकारणाचा महत्त्वाचा मुद्दा असतो.
शिक्षण मंत्र्यांच्या घरासमोर विद्यार्थ्यांचं वादळी आंदोलन; पोलिसांचा आंदोलनकांवर लाठीचार्ज
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या स्थानिक नेत्यांमध्ये काही दिग्गज पदाधिकारी भाजपाच्या आमदारांच्या ‘गुड बॉक्स’मध्ये आहेत. त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून भाजपाने प्रभाग रचनेत बाजी मारली. भोसरी मतदार संघातील एका ज्येष्ठ नगरसेवकाला प्रभाग रचना करताना प्रशासनातील अधिकाऱ्यांनी विश्वासात घ्यावे, अशा सूचना थेट राज्यातील पक्षश्रेष्ठींनी दिल्या होत्या. मात्र, संबंधित नगरसेवकाने आपला प्रभाग आणि आपले राजकीय वरदहस्त असलेल्या माजी आमदारांच्या मुलगा आणि पुतण्यासाठी आपली शक्तीपणाला लावली. भोसरी विधानसभा मतदार संघात तीन प्रभाग वगळता संधी असतानाही राष्ट्रवादीच्या संबंधित नगरसेवकाने पक्षहिताचा व्यापक विचार केलेला दिसत नाही.
पुणे महापालिकेच्या प्रभाग रचनेची नावे जाहीर; कोणत्या भागाला काय नाव…. वाचा सविस्तर…
पिंपरी विधानसभा मतदार संघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार आहेत. मात्र, भाजपाच्या आमदारांशी जवळीक असलेल्या एका ज्येष्ठ नगरसेवकाकडे प्रभाग रचनेची फिल्डिंग लावण्याची जबाबदार सोपवली होती. संबंधित ज्येष्ठ नेत्याने आपल्या मुलाच्या आणि पक्षांतर्गत विरोधकांचा बंदोबस्त करण्याच्या दृष्टीने दोन-तीन प्रभाग बसवून घेतले. त्यानंतर संपूर्ण मतदार संघात भाजपाला मोकळे रान ठेवले आहे, अशी चर्चा आहे.
चिंचवडमध्ये भाजपा बाहुबली…
पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात चिंचवड विधानसभा मतदार संघ ‘बाहुबली’मानला जातो. आमदार लक्ष्मण जगताप यांचे वर्चस्व असलेल्या या मतदार संघात शिवसेनेचा मतदार मोठा आहे. मात्र, राज्यातील सत्तेतील पक्ष असतानाही शिवसेनेला प्रभाग रचनेत अपेक्षीत हस्तक्षेप करता आला नाही. शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याला प्रभाग रचनेबाबत ताकद दिली होती. मात्र, संबंधित पदाधिकाऱ्याने एक-दोन प्रभागात आपली आणि नातेवाईकाची फिल्डिंग लावली आणि अन्य मतदार संघात भाजपाला पोषक प्रभाग रचना करण्यास अप्रत्यक्ष मदत केली आहे. परिणामी, चिंचवड मतदार संघात भाजपा ‘बाहुबली’राहील, अशी शक्यता निर्माण झाली आहे.
राष्ट्रवादीला आत्मचिंतनाची गरज…
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून गतवर्षी ३६ नगरसेवक निवडून आले आहेत. त्यापैकी १५ ते २० नगरसेवक स्वत:च्या ताकदीवर निवडून आले आहेत. त्याच नगरसेवकांना पुन्हा सभागृहात जावून विधानसभा आणि लोकसभेला आपले नशीब आजमवण्याची संधी मिळेल, अशी व्यवस्था राष्ट्रवादीतील काही आत्मकेंद्री ज्येष्ठ नगरसेवक, नेत्यांनी केली. त्यामुळे प्रभाग रचनेत भाजपाचा वरचष्मा राहीला आहे. तसेच, आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीला आपले संख्याबळ कायम ठेवण्यासाठीही कसरत करावी लागणार आहे. परिणामी, राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठींनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे.
Read also:
- भाजपाचे आजी-माजी शहराध्यक्ष म्हणतात… प्रभाग रचना आमच्यासाठी अनुकूलच!
- म्हापश्यात तृणमूल समर्थकांना मारहाण; काँग्रेस समर्थकांकडून हल्ल्याचा आरोप
- ब्रेकिंग : १०वी, १२वीच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाप्रकरणी तथाकथित हिंदुस्थानी भाऊला अटक
- नितेश राणेंची ‘त्या’ प्रकरणातून सुटका नाहीच; उद्या ३ वाजता अंतिम निर्णय होणार
- विद्यार्थ्यांनी ऑफलाईन परीक्षेसाठी सज्ज राहावे – उदय सामंत