नवी दिल्ली : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर केलेल्या अयोध्य दौऱ्याची राज्यात जोरदार चर्चा सुरू झाली. त्यानंतर उत्तर प्रदेशचे भाजपचे खासदार बृजभुषण सिंह यांनी राज ठाकरे यांना आव्हान दिल्यानंतर राज ठाकरेंनी नमतेची भूमिका घेतली. त्यानंतर पुण्यातील सभेत आमच्याविरोधात मोठा सापळा रचला असल्याची धक्कादायक माहिती राज ठाकरे यांनी दिली. यावरून भाजपने सत्तधारी पक्षावर जोरदार टिका केली. मात्र अशातच बृजभुषण सिंह यांनी यावर मोठं भाष्य केलं आहे.
गोरखपुर येथील पत्रकारांशी संवाद साधताना बृजभुषण सिंह यांनी सापळा उघड केला आहे. मी सध्या भाजप पक्षाचा सहा वेळा खासदार म्हणून निवडून आलो आहे. तसेच एक वेळा माझी पत्नी देखील निवडून आली आहे. आम्ही या भागाचं सात वेळा प्रतिनिधित्व केलं आहे. त्यामुळे आमच्या आंदोलनाला कोण मज्जाव करेल? असं त्यांनी म्हटलं आहे. त्यावेळी राज ठाकरे यांना विरोध करण्यासाठी तुम्हाला भाजपकडून सांगण्यात आलं होतं का? हा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी हे भाष्य केलं आहे.
अजून किती काळ नवाब मलिकांची पाठराखण करणार? राजीनामा घ्या; चंद्रकांत पाटील
अयोध्या दौऱ्याबाबत राज्यातील भाजपच्या काही नेत्यांनी सत्ताधारी पक्षांवर जोरदार टिका केली होती. त्यामुळे बृजभूषण सिंह यांच्या वक्तव्याने आता राज्यातील भाजपचे काही नेते तोंडघाशी पडले आहेत. राज ठाकरे यांनी पुण्यातील सभेत माझ्याविरोधात सापळा रचला असल्याने मी अयोध्या दौरा स्थगित केल्याचं सांगितलं होतं. याची रसद महाराषट्रातून पुरविली असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं.
“पवार साहेब तुमचे डायरेक्ट दाऊद सोबत संबंध नाही ना?” नवाब मलिक प्रकरणांवरून निलेश राणेंचा तिखट सवाल
दरम्यान, अयोध्या दौऱ्यावर गेल्यावर माझ्या जिवाला काही बंरवाईट झालं, तर मनसैनिक शांत बसणार नाहीत. त्यानंतर त्यांच्यावर परराज्यात खोटे गुन्हे दाखल करून त्यांना ऐननिवडणुकीच्या तोंडावर फसवण्याचा डाव होता. याची सर्व माहिती मला मुंबई आणि दिल्लीतुन मिळाली आहे. त्यामुळे यांचा डाव माझ्या लक्षात आला आहे. असं राज ठाकरे यांनी पुण्यातील सभेत बोलताना म्हटले होते.
Read also:
- इडा पिडा टळो, अन् इडीचा ससेमिरा मरो; भावना गवळी यांच्यासाठी शिवसेनेकडून यज्ञ
- “बाळासाहेबांची शिवसेना राहिली नाही आता बकरीसेना झाली”; नारायण राणेंचा शिवसेनेवर घणाघात
- “कोणत्याही अपक्षाला पाठिंबा देणार नाहीत, मग तो कुणीही असो”; राऊतांनी संभाजी राजेंना स्पष्ट सांगितले
- “पक्षात १२ वाजता या सांगून तुमची काय किंमत ठेवली? लाथ मारा त्या खासदारकीला”;
- संभाजीनगरचं नामंतर झालं, असं बोलणारा तु कोण? राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल