कोल्हापूर – महाराष्ट्रातील ६ जागांसाठी होणाऱ्या राज्यसभेच्या निवडणुकीची रंगत आता अंतिम टप्प्याजवळ पोहचली आहे. एकीकडे महाविकास आघाडीचे नेते आपले सर्व उमेदवार निवडून येण्याचे सांगत आहेत तर दुसरीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टाकलेल्या नव्या बॉम्बमुळे आघाडीची धाकधूक वाढली आहे.
भाजपचे तीनही उमेदवार हमखास विजयी होणार आहेत. यासाठी भाजपने योग्य रणनीती आखली आहे. पण त्यासाठी निवडणुकीत कोणत्याही प्रकारचा घोडेबाजार केला जाणार नाही. सहाव्या जागेवरुन आरोप-प्रत्यारोप होत असले तरी भाजपचे धनंजय महाडिक हे १०० टक्के निवडून येणार. पण त्याचवेळी आघाडीतील बडा नेता नेता पडणार, असे विधान चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. चंद्रकांत पाटलांच्या या विधानामुळे आता महाविकास आघाडीच्या उमेदवारांची धाकधूक वाढली हे मात्र नक्की.
मुंबई वॉर्डनिहाय आरक्षण जाहीर; शिवसेनेच्या महत्वाच्या नेत्यांनी वॉर्ड गमवला, भाजपला फायदा
यासोबतच महाविकास आघाडीने आमच्याशी चर्चा करुन त्यांच्यातील एक उमेदवार मागे घ्यावा, असा सल्लाही त्यानी दिला आहे. ते कोल्हापूरमध्ये माध्यमांशी बोलत होते. दरम्यान, भाजपने केंद्रीय मंत्री पियुष गोयल, माजी मंत्री अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक यांना राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. विधानसभेतील भाजपच्या आमदारांची संख्या लक्षात घेता पियुष गोयल आणि अनिल बोंडे यांच्या रुपाने भाजपच्या २ जागा सहजपणे निवडून येणार आहेत.
लुच्चा म्हणायची काय गरज होती, दीपालीला घरात घुसून बदडणार; शिवसेना भाजप पुन्हा जुंपली
मात्र धनंजय महाडिक यांच्या रुपाने भाजपने तिसरा उमेदवार मैदानात उतरवला आहे. विशेष बाब म्हणजे, जय सहाव्या जागेवर भाजपने महाडिक यांना रिंगणात उतरवले आहे, त्या जागेवर शिवसेनेने दावा केला असून, कोल्हापूरचे शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे निवडणुकीची रंगत अधिकच वाढली आहे.
Read also:
- “तुम्ही बक्षिस द्या, मर्सिडीज द्या, विमान द्या, परंतु..;” रोहित पवारांचा नितेश राणेंना टोला
- राज्यसभा निवडणूकिसाठी फडणवीसांची मोर्चेबांधणी, अपक्ष आमदरांना गळाला लावणार?
- राज्यसभा निवडणुक; नवाब मलिक, अनिल देशमुखांसाठी अजित पवार न्यायालयात जाणार ?
- “संभाजीनगरच्या”टोमणे सभेत”ढोंगी हिंदुत्ववादी उत्तर देणार का?” सभेआधी मुख्यमंत्र्यांना मनसेने डिवचलं
- “मोदींच्या नेतृत्वाखाली एक छोटासा सैनिक म्हणून काम करणार”; हार्दिक पटेल