नाशिक : राज्यातील पाच ठिकाणी शिक्षक आणि पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी मतदान झालं. या निवडणुकीत सगळ्याच जास्त नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीची चर्चा झाली. ऐनवेळी डॉ. सत्यजीत तांबेंनी अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला. यातच सत्यजीत तांबेंना भाजप पाठिंबा देणार का? याकडे सगळ्यांचं लक्ष्य होतं. यातच सत्यजीत तांबेंना भाजपमध्ये येण्याची खुली ऑफर देण्यात आली आहे.
“हिंदु आक्रोश मोर्चा हा मोदी आणि शहांच्या विरोधात,” संजय राऊतांची भाजपवर प्रखरशब्दात टिका
भाजपचे नेते आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सत्यजीत तांबे यांना भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली आहे. पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी मतदान झाल्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधतांना सत्यजीत तांबेंबाबत वक्तव्य केलं आहे. त्यातच सत्यजीत तांबे यांनी भाजपची ऑफर धुडकावून लावली आहे. अपक्ष म्हणून होतो. अपक्ष म्हणूनच राहणार असल्याचं सत्यजीत तांबे यांनी म्हटलं आहे.
कसबा पोटनिवडणुकीत आघाडीत रस्सीखेच आणखीच वाढली, शिवसेना, काॅंग्रेसमध्येच जुंपली
सत्यजीत तांबे म्हणाले की, नाशिक पदवीधर मतदार संघ हा 54 तालुक्यांचा आणि चार हजारांपेक्षा जास्त गाव असल्याचा मतदार संघ आहे. त्यामुळे येथील सगळ्याच संघटनांनी आम्हाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे या निवडणुकीत विजय माझा झालाच आहे. फक्त मताधिक्य किती पडतंय. ते पाहणं आवश्यक आहे. आता पर्यंत 100 संघटना आणि विविध राजकीय नेत्यांनी मला पाठिंबा दिला आहे. एक चांगला उमेदवार म्हणून तुमच्या पाठिशी लोकं उभ राहत असतील तर त्याचा अधिक आनंद आहे. असंही ते म्हणाले.
तसेच आगामी काही काळात तुम्ही एकाद्या पक्षात प्रवेश करणार का ? या प्रश्नावर ते म्हणाले की, मी अपक्ष म्हणून आहे, आणि भविष्यातही अपक्ष म्हणूनच राहणार आहे. तसेच माझ्यावर आणि माझ्या कुटुंबियावर जे काही गेल्या दहा दिवसांपासून राजकारण सुरू आहे. त्यावर वेळ आल्यावर योग्य ते उत्तर देऊ. असंही सत्यजीत तांबे म्हणाले.
Read also
- शिवसेना, धनुष्यबाणा संदर्भात ठाकरे अन् शिंदे गटाचं लेखी उत्तर…! निवडणुक आयोगाकडे दाखल
- पिंपरी-चिंचवडमध्ये आता ‘रामराज्य’ : शिंदे-फडणवीस सरकारची आमदार लांडगेंना ताकद!
- “माझाच विजय झाला आहे, आता फक्त निकालाची वाट”, मतमोजणीआधी सत्यजीत तांबेंचा विश्वास
- पुण्यात आपचं संघटन वाढतयं…! काळजेवाडी चऱ्होली बुद्रुक येथे आप च्या शाखेचे उदघाटन
- “..तर त्यावेळी महेश लांडगे हे शिवसेनेचे आमदार झाले असते”, शिंदेंनी सांगितली जुनी आठवण