मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे नेहमी, त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून आणि त्यांच्या भाजप-काँग्रेसवर केलेल्या टिकेवरून चर्चेत असतात. मात्र, यावेळी ते चर्चेत आहेत, ते एका वेगळ्याच कारणामुळे, संजय राऊतांच्या सांगण्यावरुन काही पुरुषांकडून मारहाण व छळ केल्याचा आरोप, ३६ वर्षांच्या महिलेने संजय राऊत यांच्यावर केला असून, आता या आरोपांबाबत चौकशी करण्याचे आदेश, मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई पोलीस आयुक्तांना दिले आहेत.
हे पण वाचा, महाविकास आघाडी सरकार कडून पावसाळी अधिवेशन केवळ दोन दिवसांचं! भाजपकडून जोरदार टीका
मानसशास्त्रज्ञ असणाऱ्या या महिलेने, फेब्रुवारीमध्ये, संजय राऊत यांच्या सांगण्यावरून काही अज्ञात लोकांनी आपल्यावर दगडफेक केली आणि त्रास दिला, असा दावा करत, उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती एन. जे. जमादार यांच्या खंडपीठाने मंगळवारी सुनावणी घेत, पोलीस आयुक्तांना चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, याबाबत २४ जून पर्यंत न्यायालयात अहवाल सादर करण्याचे निर्देशही कोर्टाने पोलिसांना दिले आहेत.
हे पण वाचा, हे जेनतेच्या हिताच सरकार आहे की तमाशा आहे? – देवेंद्र फडणवीस
दरम्यान, टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, “याचिका दाखल केल्यानंतर या महिलेला, अज्ञात प्रकरणात अटक करण्यात आली होती, यात तिने तिने बनावट पीएचडी पदवी घेतल्याचा आरोप तिच्यावर लावण्यात आला होता,” असे याचिकार्त्या महिलेच्या वकिल आभा सिंह यांनी, मुंबई उच्च न्यायालयाला सांगितले असून, “याचिकाकर्त्या १० दिवस तुरूंगात आहेत. त्यांनी हायकोर्टात याचिका दाखल केल्यानंतर, त्यांच्यावर संपूर्ण पोलीस यंत्रणेने दबाव टाकला, हे पूर्णपणे गैर आहे,” असे त्यांनी यावेळी नमूद केले आहे. त्यामुळे, अटकेला आव्हान देण्यासाठी याचिकाकर्ता स्वतंत्र याचिका दाखल करू शकते, असं कोर्टानं म्हटलं आहे.
हे पण वाचा, शरद पवारांच्या पे रोलवर राहण्यापेक्षा शिवसैनिकांच्या व्यथा मांडा; चंद्रकांतदादांचा राऊतांना सल्ला
दुसरीकडे, ‘ही महिला मला मुलीसारखी आहे. तिच्या कुटुंबाशी, माझ्या कुटुंबाचे स्नेहाचे संबंध आहेत. तिचा पतीसोबत वाद सुरू आहे आणि या प्रकरणात मी तिच्या पतीची बाजू घेत असल्याने, त्या समजातून ती माझ्यावर हे आरोप करत आहे,’ असा दावा राऊत यांच्यावतीने अॅड्. प्रसाद ढाकेफाळकर यांनी केला होता. यावर, ‘मुलगी असणे आणि मुलीसारखे असणे यात फरक आहे, असं म्हणत या महिलेने राऊत यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्याची मागणी केली होती.
Read Also :
- “राष्ट्रमंच’ हा केवळ बातमीत राहण्यापुरता केलेला केविलवाणा आणि नवा हास्यास्पद प्रयोग”
- महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार धोक्यात आलं आहे का? पृथ्वीराज चव्हाण म्हणाले…
- साई रिसॅार्टचे मालक अनिल परबच! परबांच्या अडचणीत वाढ
- राज्यात मांडीला मांडी, पण दिल्लीत पवारांच्या बैठकीला दांडी; संजय राऊत म्हणतात…
- चद्रकांत पाटील म्हणाले; जयंतराव असा त्रास देणे तुम्हाला शोभत नाही