पुणे : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या पत्नी नीलम राणे आणि मुलगा आमदार नितेश राणे यांच्याविरुद्ध पुणे क्राईम ब्रँचकडून लूकआऊट नोटीस जारी करण्यात आली असून, त्यामुळे राणे कुटुंबियांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नितेश राणे आणि नीलम राणेंच्या नावाने DHFL कंपनीकडून घेतलेलं ६५ कोटींचं कर्ज थकवण्यात आल्याने कंपनीकडून तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर कोर्टाच्या आदेशानंतर त्यांच्यावर कारवाई केली गेली आहे.
साताऱ्यात उदयनराजे-शिवेंद्रराजे समर्थकांत तुफान राडा, ६ गंभीर जखमी १६ जणांविरोधात गुन्हा
या प्रकरणी दिवाण हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीने तक्रार नोंदवली होती. राणे कुटुंबियांनी ‘आर्टलाईन प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीसाठी २५ कोटींचं कर्ज घेतलं होतं. ज्यासाठी नीलम राणे आणि नितेश राणे सहअर्जदार आहेत. तसेच, ‘नीलम हॉटेल्स प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीने देखील ४० कोटींचं कर्ज घेतलं होतं. त्यामुळे एकत्रित करून ६५ कोटी रुपयांच्या कर्जाची परतफेड न झाल्याने ही कारवाई केली गेली आहे.
Maharashtra | A look out circular has been issued against BJP leader Nitesh Narayan Rane and his mother by Pune City Police on Sept 3, in a loan-related case in the DHFL matter.
— ANI (@ANI) September 9, 2021
परमबीर सिंग आणि भाजपचं साटंलोटं? नवाब मलिकांनी केला गंभीर आरोप
दरम्यान, या प्रकरणावर पुणे गुन्हे शाखेच्या आयुक्तांचं म्हणणं आहे की, “आमच्याकडे संबंधित कंपनीची तक्रार आली होती. त्यानंतर न्यायालयाकडून आदेश आल्यानंतर ही लुकआउट नोटीस राणे कुटुंबीयांना जारी केली गेली आहे. आमच्याकडून नियमांचे पालन करूनच या गोष्टी झाल्या असून, नियमाप्रमाणे त्यांच्याकडून जी थकबाकी आहे, ती पाहता DHFL कडून ही तक्रार पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती.
भुजबळ म्हणतात, सत्य परेशान होता है, पराजित नहीं! सोमय्या म्हणतात, आगे आगे देखो, होता है.!
दुसरीकडे, काही दिवसांपूर्वी नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आक्षेपार्ह विधान केलं होतं. त्यांनतर त्यांना अटक करण्यात आली होती. अखेर रात्री उशिरा त्यांना महाड कोर्टाकडून जामीन मंजूर झाला. त्यानंतर पुन्हा एकदा चिपी विमानतळाच्या उदघाटन समारंभावरून आणि श्रेयवादावरून राणे यांनी मुख्यमंत्र्यांना डिवचलं. पण आता राणे कुटुंबियांच्या अडचणीत वाढ होत असताना पाहायला मिळत आहे. या प्रकरणी राणे किंवा त्यांच्या कुटुंबियांकडून अजून प्रतिक्रिया आलेली नाही.
Read Also :
- अजित पवार जरंडेश्वर कारखान्याची कागदपत्रं उघड करण्याची हिंमत का दाखवत नाहीत? – किरीट सोमय्या
- राष्ट्रवादीच्या बैठकीवर आणि मुख्यमंत्री-पवार यांच्या भेटीवर अजित पवार म्हणतात…
- ठाकरे कुटुंबाची मर्जी राखण्यासाठी धडपड, महिलांवरील अत्याचाराबाबत नीलम गोऱ्हे यांचे मौन का?
- कोर्टाच्या दिलासादायक निर्णयांनंतर भुजबळांनी, शायराना अंदाजात दिली पहिली प्रतिक्रिया
- ब्रेकिंग! महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी छगन भुजबळांसह ७ जणांची निर्दोष मुक्तता