पुणे : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील स्थायी समिती अध्यक्ष नितिन लांडगे यांच्यासह ४ जणांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं कारवाई केली आहे. या कारवाईबाबत महापालिकेतील सत्ताधारी भाजपकडून हे राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप करण्यात येत आला आहे. या आरोपांबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रश्न विचारला असता, “ही कारवाई सूडबुद्धीने झालेली नाही, जर तुम्ही भ्रष्टाचार केला नाही तर, तुम्ही त्यात सापडू शकता का? सूडबुद्धीनं कारवाई हे चुकीचं वक्तव्य आहे. त्याला काही अर्थ नाही”, असं स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.
राज ठाकरेंनी राष्ट्रवादीवर केलेल्या ‘त्या’ आरोपावर अजित पवार उत्तरले, म्हणाले…
अजित पवार म्हणाले, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षांवर कारवाई झाली तर आम्ही कारवाई केली. जर आमच्यावर कारवाई झाली तर त्या संस्थेला मुभा आहे, म्हणून कारवाई झाली असतं बोलतात. वास्तविक कुणाचं तरी काहीतरी चुकलं आहे म्हणून एसीबीने कारवाई केली आहे. या कारवाईत राजकीय हेतू नाही. प्रत्येकानं पारदर्शकपणे काम करावं ही जनतेची अपेक्षा आहे. कुणी चुकीचं काम करत असेल तर त्यांच्यावर कारवाई करणं हे एसीबीचं काम आहे. कुठेतरी पाणी मुरत असेल तर त्या लोकांना शासन करणं हे एसीबीच्या कामाचा भाग असल्याचंही पवार यांनी म्हटलं आहे.
रोहित पवारांनी राज ठाकरेंचे ‘कौतुक’ करत काढला भाजपला चिमटा, म्हणाले…
दरम्यान, एसीबीआच्या कारवाईनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप असा संघर्ष सुरू झाल्याचं चित्र शहरात दिसून येत आहे. या प्रकरणात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दोषींवर कारवाई केली जाईल, असं आश्वासन दिलं आहे. तसंच स्थायी समिती सदस्यांनी तपासात सहकार्य करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत. चंद्रकांत पाटील यांच्या सुचनेनुसार पिंपरी-चिंचवडच्या प्रभारी आमदार माधुरी मिसाळ यांनी पिंपरी-चिचवडला भेट दिली. तिथे घडलेल्या प्रकाराबद्दल सर्व संबंधीतांशी चर्चा करुन सविस्तर माहिती घेतली.
मी प्रबोधनकार पण वाचलेत आणि यशवंतराव पण – राज ठाकरे
या प्रकरणाबाबत सविस्तर अहवाल त्या मला सादर करतील आणि त्यानंतर या प्रकरणात कोणी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं. तसेच स्थायी समितीच्या सर्व सदस्यांनी पोलिस तपासात संपुर्ण सहकार्य करावे अशी सुचनाही चंद्रकांतदादा पाटील यांनी केली आहे. या सर्व प्रकरणातील सत्य लवकरच बाहेर येईल व या षडयंत्रा मागील चेहरा समाजापुढे उघड होईल असेही चंद्रकांतदादा पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.
Read Also :
- राज ठाकरेंच्या राष्ट्रवादीवर केलेल्या टीकेला, भाजपकडून पहिल्यांदाच दिली गेली प्रतिक्रिया
- तर मात्र आपल्याला कदाचित लॉकडाऊन लावावा लागेल”, मुख्यमंत्र्यांचे सूतोवाच
- भाजप नेते रावसाहेब दानवे आणि भागवत कराड यांच्यावर गुन्हे दाखल करा – इम्तियाज जलील
- उद्धव ठाकरेंनी सोनिया गांधींना सांगितली ‘मनातली गोष्ट’! राऊतांचा गौप्यस्फोट
- कोरोना मधून जगायचं, महागाईमध्ये मरायचं; दरवाढी विरोधात पुण्यात राष्ट्रवादीचे जागरण गोंधळ आंदोलन