पुणे : पिंपरी-चिंचवड महापालिकेत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून स्थायी समिती अध्यक्षांसह पाच जणांवर मोठी कारवाई केली. या घटनेला आठवडा देखील पुर्ण झाला नसून काल स्थायीच्या अध्यक्षांना जामीन मंजूर होताच दुसरीकडे पुणे महापालिकेत लाचलुचतप प्रतिबंधक विभागाच्या पथकाने एका उप अभियंत्याला ४० हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे. त्यामुळे, पिंपरी आणि पुणे महापालिकेत दिवसेंदिवस भ्रष्टाचार बोगाळत असल्याचा सुरू उमटू लागला आहे.
मुख्यमंत्र्याबद्दल बेताल वक्तव्य; केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक होणार?
पुणे महापालिकेत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून महापालिकेच्या पथविभागातील उप अभियंता सुधीर सोनवणे या अधिकाऱ्याला रंगेहात पकडले आहे. शाळा दुरुस्तीच्या कामाचे बिल काढण्यासाठी त्याने ५० हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यापैकी ४० हजाराची लाच घेताना महापालिकेच्या पार्किंगच्या आवारातून त्यास अॅन्टी करप्शन विभागाने ताब्यात घेतले.
‘त्या’ वक्तव्याच्या पाठीशी नाही, पण भाजप नारायण राणेंच्या पूर्णपणे पाठिशी- फडणवीस
अॅन्टी करप्शन विभागाने काही दिवसांपुर्वी पिंपरी-चिंचवड महापालिकेत सापळा रचून कारवाई केली होती. लाच प्रकरणी थेट स्थायी समितीचे अध्यक्ष अॅड. नितीन लांडगे यांच्यासह त्यांच्या पीएला आणि इतर चौघांना अटक केली होती. आजच (सोमवार) अॅड. नितीन लांडगे यांचा अंतरिम जामिन मंजूर झाला आहे. पिंपरी महापालिकेतील लाच प्रकरण ताजे असतानाच पुणे महापालिकेच्या उप अभियंत्याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागा ने ४० हजार रूपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे.
नारायण राणेंना अटक करुनच दाखवा; भाजप नेत्यांच सरकारला पुन्हा चॅलेंज
पुणे लाचलुचतप प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अप्पर अधीक्षक सुरज गुरव, अप्पर अधीक्षक सुहास नाडगौडा, उप अधीक्षक श्रीहरी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे अॅन्टी करप्शनच्या पथकाने ही कारवाई केली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून पुढील तपास अॅन्टी करप्शनचे अधिकारी करीत आहेत.
Read Also :
- पुण्यातल्या आर डेक्कन मॉलवर शिवसैनिकांची दगडफेक; भाजप कार्यलयात कोंबड्या सोडल्या
- “नारायण राणेंना ठाण्याच्या रुग्णालयात भरती करुन शॉक दिला पाहिजे”- गुलाबराव पाटील
- राणे “कोंबडी चोर” अन् ठाकरे “घर कोंबडा”; बॅनरबाजीवरून शिवसेना-भाजपात रंगला कलगीतुरा
- खऱ्या आईचं दूध प्यायला असाल तर समोर या, तुमची औकात दाखवतो – निलेश राणे
- नारायण राणेंची केंद्रीय मंत्रीमंडळातून हकालपट्टी करा; शिवसेना खासदाराचे मोंदींना पत्र