– भाजपासह राष्ट्रवादी, शिवसेनाही आता ‘जात्यात’
पिंपरी चिंचवड : लाच प्रकरणात प्रकरणात पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समिती सभापती नितीन लांडगे यांचा जामीन अर्ज शिवाजीनगर न्यायालयाने फेटाळला आहे. तसेच, नितीन लांडगे यांच्या दालनातील चार कर्मचारी आणि स्थायी समितीतील राष्ट्रवादीचे ४ आणि शिवसेनेचे २ सदस्यांची चौकशी करण्याची मागणी एसीबीने न्यायालयात केली आहे, अशी माहिती समोर आली आहे. शिवाजीनगर न्यायालयात एस. बी. हेडाऊ यांच्या कोर्टापुढे आरोपींना आज सकाळी हजर करण्यात आले. सुमारे ४५ मिनिटे आरोपी व सरकारी वकील यांच्या प्रश्नोत्तरे झाली. व त्यानंतर न्यायमूर्तींनी येत्या सोमवारी, दि. २३ ऑगस्ट रोजी कोर्टात हजर करण्याचे आदेश दिले आहेत.
पिंपरी-चिंचवडमध्ये राजकीय दबावतंत्र : भाजपा-राष्ट्रवादीत सत्तेसाठी ‘महाभारत’; स्थानिक एकवटणार
पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समिती कार्यालयात दि. १८ ऑगस्ट रोजी अँटिकरप्शन्स विभागाची धाड पडली.रोख रक्कम व काही साहित्य जप्त करण्यात आली. त्यांना गुरुवारी शिवाजीनगर कोर्टात हजर केले असता शनिवारी सकाळी ११ वाजेपर्यंत पोलीस कोठडी दिली. त्यांना चौकशीसाठी पुण्यातील बंडगार्डन पोलिस स्टेशनमध्ये ठेवण्यात आले होते. आज पोलिसांनी सभापती नितीन लांडगे व पाच कर्मचारी यांना सकाळी ११ वाजता हजर केले असता कोर्टाने त्यांचा जमीन अर्ज फेटाळला असून, त्यांना सोमवारी पुन्हा हजर करण्याचे आदेश दिले आहेत.
‘स्पर्श’ प्रकरणाचीही चौकशीची शक्यता?
लाच प्रकरणावरुन राष्ट्रवादी आणि शिवसेने टीका केल्यानंतर आता भाजपा आक्रमक भूमिका घेणार आहे. महापालिकेतील ‘स्पर्श’ प्रकरणाची चौकशी लाच लुचपत विभाग किंवा अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) होण्याची शक्यता आहे. त्याद्वारे भाजपा हा विषय ‘स्पर्श’च्या दिशेने वळवण्याचा प्रयत्न करीत आहे. असे झाल्यास शहरातील दोन नगरसेवकांसह पत्रकार आणि राज्यातील एका बड्या नेत्याचा मुलगा अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
राष्ट्रवादी अन् शिवसेनेच्या अडचणीही वाढल्या…
दरम्यान, लाच प्रकरणात स्थायी समितीतील राष्ट्रवादी आणि शिवसेना सदस्यांचीही चौकशी करण्याची मागणी लाच लुचपत विभागाने न्यायालयाकडे केली आहे. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या अडचणींत वाढ होणार आहे. दोन दिवसांपासून महापालिकेत शिवसेना आणि राष्ट्रवादीने लाच प्रकरणावरुन भाजपाला घेण्याचा प्रयत्न केला आहे. आता स्थायी समिती दालनात टाकलेल्या छाप्यामध्ये सापडलेल्या लिफाफ्यांवर राष्ट्रवादी आणि शिवसेना सदस्यांचीही नावे आहेत. त्यामुळे भाजपाचे १०, राष्ट्रवादीचे ४ आणि शिवसेनेच्या २ सदस्यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. परिणामी, राष्ट्रवादी आणि शिवसेनेला लाच प्रकरणावर आंदोलन करण्याचा अधिकार आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
पिंपरी चिंचवड लाचखोरी प्रकरणातील दोषींवर कारवाई करणार; चंद्रकांत पाटील यांचे निर्देश
पिंपरी-चिंचवडमधील ठेकेदार, अधिकारी, संबंधित पदाधिकारी कोणीही धुतल्या तांदळासारखे नाही. ज्या ठेकेदाराने लाच प्रकरणात स्थायी समितीची तक्रार केली आहे. कोहली नावाच्या ठेकेदार तक्रारदार आहे. मात्र, या ठेकेदाराची संस्था महापालिकेत ‘ब्लॅक लिस्ट’ आहे. एक वर्षापूर्वी पोलीस अधिकाऱ्याकडे खंडणी मागितल्याप्रकरणी संबंधितावर भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे. तसेच, अनधिकृत होर्डिंग उभारल्याप्रकरणी संबंधित ठेकेदाराला महापालिका प्रशासनाने नोटीसही बजावलेली आहे.
Read Also :
- …अन् उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वत: कचरा उचलला; काय झालं नेमकं…!
- भाजपची जन आशीर्वाद यात्रा वादाच्या भोवऱ्यात; मुंबई पोलिसांकडून तब्बल ३६ गुन्हे दाखल
- लायकी नसलेल्या दीडदमडीच्या लोकांनी राज ठाकरेंबद्दल बोलू नये – मनसे
- २५० कोटींच्या कथित घोटाळ्याची चौकशी होणार; अनिल परब यांच्या अडचणी वाढणार?
- पिंपरी चिंचवड लाचखोरी प्रकरणातील दोषींवर कारवाई करणार; चंद्रकांत पाटील यांचे निर्देश