कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यातील अत्यंत महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या गोकुळ(जिल्हा दूध उत्पादक संघ) निवडणुकीच्या मतमोजणीला आता सुरुवात झाली आहे. गोकुळच्या निमित्ताने कोल्हापुरातील राजकारण चांगलेच ढवळून निघाले होते. अनेक वर्षांपासून चालू असलेली पारंपरिक खुन्नस या वेळी देखील पाहायला मिळालेली आहे. पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील आणि माजी खासदार धनंजय उर्फ मुन्ना महाडिक यांच्यातील संघर्ष गोकुळ च्या निमित्ताने पुन्हा एकदा बघायला मिळाला होता. त्यातच सत्ताधारी आमदार बी.एन.पाटील,माजी आमदार महादेवराव महाडिक विरुद्ध ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यात देखील काटे कि टक्कर बघायला मिळणार आहे. gokul election 2021
गोकुळ दूध संघाच्या मतमोजणीच्या पहिल्या आणि दुसऱ्या फेरीला देखील आता सुरुवात झालेली आहे.दोन्ही फेऱ्यांमध्ये सतेज पाटील-हसन मुश्रीफ गट आघाडीवर आहे. आरक्षित असणाऱ्या पाचही जागांवर पाटील-मुश्रीफ गट आघाडीवर आहे. असेच जर सर्व-साधारण गटामध्ये असणाऱ्या ३३ जागांसाठी झाले तर पाटील-मुश्रीफ गटाची सत्ता गोकुळ वर स्पष्ट पणे दिसणार आहे. गोकुळ दूध संघाच्या पहिल्या दोन आरक्षित जागांचे निकाल आता नुकतेच जाहीर झालेले आहेत.
गोकुळ दूध संघाच्या आरक्षित असलेल्या पाच जागांपैकी तीन जागांवर आता पाटील-मुश्रीफ गटाचे सदस्य विजयी झालेले आहेत. अमरसिंह पाटील हे ४६६ मतांनी विजयी झाले आहेत. आमदार डॉ. सूचित मिचनेकर हे ३४६ मतांनी विजयी झालेले आहेत. बायजी शेळके हे २३९ मतांनी विजयी झालेले आहेत. पाचही जागांवर पिछाडीवर गेल्याने आणि तीन जागांवर मोठा पराभव झाल्याने आता सत्ताधारी महाडिक गटात चिंतेचे वातावरण आता पसरण्यास सुरुवात झालेली आहे.