रायगड : छत्रपती संभाजी राजे यांनी मराठा समाजाला एकसंघ करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात जनसंवाद यात्रा सुरू केली. रायगड जिल्ह्यातून या संवाद यात्रेला सुरुवात झाली आहे. खालापुरात वावोशी व खोपोली शहरमध्ये सभा आयोजित करण्यात आली. यावेळी खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी अजून वेळ गेली नाही, असे म्हटले आहे. अन्यथा लॉंगमार्चचा निर्णय घेतला जाईल, असा राज्य सरकारला इशारा दिला आहे.
विधानसभा अध्यक्षांच्या नावाची चर्चा पुन्हा सुरू; महाविकास आघाडीला आमदार फुटण्याची भीती!
संपूर्ण महाराष्ट्रात मागील अनेक वर्षांपासून आरक्षणासाठी मराठा समाजबांधव रस्त्यावर उतरून आरक्षण मागत मागत आहेत. जवळपास 58 मुक मोर्चे काढण्यात आले. 9 सप्टेंबर रोजी उच्च न्यायालयाने आरक्षण नाकारले. तेव्हापासून छत्रपती संभाजी राजे यांनी पुन्हा महाराष्ट्रात समाजबाधवांच्या भेटींसाठी दौरा सुरू केला.
महाविकास आघाडी सरकारने औकातीत राहावं, अन्यथा गाठ माझ्याशी आहे; भाजप आमदाराने भरला दम
संवाद यात्रेच्या निमित्ताने समाज बांधवाशी संवाद साधताना खासदार छत्रपती संभाजी राजे म्हणाले की, आधीच्या मुख्यमंत्र्यानी जे केले, तेच आता हे राज्य सरकार करीत आहे. एकमेकांकडे बोट दाखविण्याचा प्रकार सुरू आहे. मी भाजपच्या कोट्यातून झालेला खासदार आहे. म्हणून माझ्यावर भाजपचे लेबल लावले आहे. पण मी छत्रपती शिवाजी महाराजांचा वंशज म्हणून खासदार आहे. मी भाजपचा असतो, तर मला हाऊसमध्ये आरक्षणासंदर्भात बोलण्याची संधी मिळाली असती. पण मला बोलू दिले नाही. तेव्हा शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाने मदत केली. सारथी शिक्षण संस्थेला मदत करा, यासारख्या छोट्या मागण्या आहेत. तरीही यावर विचार होत नसल्याने आम्हाला ही संवाद यात्रा काढावी लागली.
तपास अधिकाऱ्याची जात, धर्म काढणं योग्य नाही; आरोप लागले आहेत तर चौकशी करा – देवेंद्र फडणवीस
वसतीगृहासाठी आण्णासाहेब पाटील महामंडळातून १ हजार कोटी द्या, त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना शिकण्याची संधी मिळेल, आरक्षणामध्ये बलिदान दिले त्यांच्या नातेवाईकाला नोकरी द्या, त्याचबरोबर विद्यार्थ्यांवर अन्याय करू नका, सारथी शिक्षण संस्थेला मदत करा, या सारख्या छोट्या मागण्या आहेत. त्यांचाही विचार सरकारकडून पूर्ण होत नसल्याने ही संवाद यात्रा काढल्याचे मतही त्यांनी यावेळी मांडले.
Read Also :
- बिघडलेल्या बबड्यासारखी भाजपची अवस्था झाली, नेते खिशात आगपेटी घेवून फिरतायं – निलम गोऱ्हे
- समीर वानखेडेच्या जातीचा दाखला खोटा ठरल्यास मी मंत्रीपदाचा राजीनामा देणार – नवाब मलिक
- मोठी बातमी : देवेंद्र फडणवीसाना जलयुक्त शिवार योजनेप्रकरणी ठाकरे सरकारकडून क्लीन चीट
- समीर वानखेडेंच्या पहिल्या विवाहाबाबत नवाब मलिकांचा अजून एक गौप्यस्फोट; म्हणाले…
- विधानसभा अध्यक्षांच्या नावाची चर्चा पुन्हा सुरू; महाविकास आघाडीला आमदार फुटण्याची भीती!