प्रतिनिधी, वैभव : यंदाच्या वर्षात बऱ्यांच कंपन्यांनी आपल्या वनडर लूक असलेल्या गाड्या लाँच करण्याची तयारी दाखवली आहे. लॉकडाऊन सुरु असताना देखील यंदा काही वाहन निर्मिती क्षेत्रातील कंपन्यांनी आपली वाहने व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे लाँच केली आहेत. यात ह्युंडाय, कीआय, स्कोडा, एमजी सारख्या कंपन्यांनी अशा काही झकास आणि रिच लूक देणाऱ्या कार लाँच केल्या आहेत की रस्त्यावर या गाड्या उतरल्यावर त्याकडे पाहातच राहावे अशा असतील. या नुसत्या रस्त्यावर आपली छाप सोडणार नाहीत तर यात बसण्याचा तुमचा अनुभव देखील खास असणार आहे.
2020 च्या सुरुवातीला काही कार तर लॉन्च झाल्या आहेत. पण आता येत्या काही महिन्यात काही कार लॉन्च होत आहे.
1. किया सोनेट – येत्या ऑगस्ट महिन्यात किया या कंपनीची सोनेट (sonet) ही एसयूव्ही कार भारतात लॉन्च करण्यात येणार आहे. ही कार हुंडायच्या वेन्यू आणि मारुतीची ब्रिजा, टाटा नेक्सन यांना टक्कर देऊ शकते.
या कार च्या लुकच आणि डिजाईन बोलायचं झालं तर या कारच्या हेड लाईट भुरळ घालणाऱ्या आहेत. ग्रील चा विचार केला तर इतर किया च्या कार सारखेच आहेत. टेल लाईट आणि मागील लुक कार ने एखादा गॉगल घातला आहे असे आहेत. या कारची किंमत 7 ते 11 लाखाच्या दरम्यान असेल.
2. महिंद्रा Scorpio – या वर्षात महिंद्रा आपली दमदार scorpio कार नव्या जनरेशन आणि ग्राफिक्स लूकसह लॉन्च करत आहे. ही कार 2 लीटर पेट्रोल आणि डिझेल इंजिन मध्ये असणार आहे. या कार ची किंमत 11 ते 17 लाख रुपये दरम्यान असेल. ही लोकप्रिय कार आपल्या आधीच्या मॉडेल सारखीच असेल पण याची आताची खासियत कार वरील ग्राफिक्स असणार आहे.
3. Citroen C5 aircross –
फ़्रेंच बनावटीची कार या वर्षी भारतात येण्यास तयार आहे. Citroen ही कंपनी भारतात पहिल्यांदाच आपली कार लॉन्च करून भारतीय बाजारत उतरत आहे. ऑगस्ट महिन्यात ही कार भारतीय बाजारात दाखल होऊ शकते.
ही कार पेट्रोल डिझेल दोन्ही व्हर्जन मध्ये मिळणार आहे. फिचर चा विचार केला तर यात क्लायमेट कंट्रोल आणि पेनेरोमिक सन रूफ मिळणार आहे. या कर मध्ये फ्रंट आणि रिअर पार्किंग सेन्सर मिळणार आहे त्याच सोबत 12.3 इंच चा डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर मिळणार आहे.
या कारच्या किमतीचा विचार केला तर या कारची सुरुवातीची किंमत 18 ते 20 लाख फरम्यान असेल. एमजी हेक्टर, टाटा हरिअर या कारशी ही कार स्पर्धा करू शकते.
4. Tata HBX –
टाटाची ही स्टायलिश कार 2020 च्या अखेरीस बाजारात दाखल होऊ शकते. मारुती इग्निस आणि kuv 100 ला ही कार टक्कर देऊ शकते. समोरून टाटा हेक्टर सारखी दुसणारी हे कार उर्वरित 3 बाजूनी वेगळ्या लुकची आहे. या कारच्या टेल लाईट तर खूपच साजेशा अशा आहेत. या कारची केबिन अत्यंत आरामदायक बनवण्यात अली आहे. यात आर्म रेस्ट अडजेस्टेबल हेड रेस्ट देण्यात आला आहे.
इंजिन चा विचार केला तर यात 1.2 लीटरचे पेट्रोल इंजिन असेल.
या कारची किंमत 5 ते 7 लाख दरम्यान असेल.
5. मारुती सुजूकी New Gen Celerio – मारुती सुजूकी आपल्या सेलेरिओ या कारचे नवे जेनरेशन बाजारात आणत आहे. भारतीय बाजारात आल्या पासून या कारचे नवीन जेनरेशन अपडेट आले नव्हते. मात्र वर्षाच्या अखेरीस कंपनी सेलेरिओ अपडेट जेनरेशन बाजारत आणू शकतो.
यात 1.2 लीटर चे पेट्रोल इंजिन असेल जे वेगनार, डिजायरमध्ये देखील आहे.
या आहेत कार ज्या वर्षीच्या अखेरीस भारतात लॉन्च होऊ शकतात. या कार ची अनेकजण वाट पाहत आहेत. या वर्षाची खासियत असणार आहे एमजी हेक्टर प्लस. ही कार देखील भारतीय बाजारात लवकरच दाखल होऊ शकते.