देशातील ऐतिहासिक राम मंदिराच्या भूमिपूजनाची तयारी आता जवळपास पूर्ण झाली आहे. उद्या सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिर भूमिपूजनाचा सोहळा पार पडणार आहे. त्यासाठी मान्यवरांना निमंत्रण पाठवण्यास सुरूवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहराचे अध्यक्ष आणि भोसरी मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे यांनी नागरिकांना हा सोहळा साजरा करण्याचे आवाहन केले आहे.
राम मंदिर भूमिपुजनाचा हा सोहळा आपण सर्वांनी आपापल्या घरातून साजरा करावा व त्याद्वारे आपला परिसर, राज्य व राष्ट्र राममय करावे. असे आवाहन पिंपरी चिंचवड शहराचे अध्यक्ष आणि भोसरी मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे यानी केले आहे.
“उद्या होणाऱ्या राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याचे आपण सर्व साक्षीदार होणार आहे. अनेक जणांनी या राम मंदिर उभारण्यात आपले योगदान दिले. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा ऐतिहासिक सोहळा अस्तिवात आणला आहे. आणि अखेर उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा भूमिपूनचा सोहळा पार पाडणार आहे.” असे म्हणत आमदार महेश लांडगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले आहे.
“तसेच संपूर्ण हिंदुस्थान प्रभू रामचंद्र यांच्या जयघोषाने दुमदुमून जाणार आहे. त्यामुळे कोरोनाच्या संकटकाळात उद्याचा आनंद आत्मसात करायचा आहे. परंतु हा आनंद अनुभवताना आपण प्रशासनच्या नियमांचे पालन करूनच या सोहळ्याचा आनंद साजरा केला पाहिजे. सुरक्षित अंतर ठेऊन तसेच रस्त्यावर न येता आपआपल्या घरात आपल्या परिवारासोबत हा उत्सव साजरा केला पाहिजे. घरात प्रभू श्रीराम यांच्या प्रतिमेचे पूजन करून आरती करून तसेच घरासमोर रांगोळी काढून हा उत्सव आपण साजरा करू शकतो” असे आवाहन पिंपरी चिंचवड शहराचे अध्यक्ष आणि भोसरी मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे यांनी सर्व नागरिकांना केले आहे.