‘एक शरद, सगळे गारद’ असे सांगत संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घेतलेल्या मुलाखतीचा प्रोमो आपल्या ट्वीटरवरुन प्रसिद्ध केला आहे. त्याबाबत प्रतिक्रिया उमटत आहेत. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. “शरद पवारांनी अनेकांना गारद केलेलच आहे” , अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली आहे.
संजय राऊत यांनी घेतलेल्या शरद पवारांच्या मुलाखतीची उत्सुकता महाराष्ट्रासह संबंध देशाला आहे. मला ही आहे.नक्की काय काय सांगितले आहे. हे पाहायचं आहे.बाकी शब्दांचा खेळ चालत राहतो, आणि तसे ही शरद पवारांनी अनेकांना गारद केलेलच आहे त्यामुळे ते शब्द अतिशय समर्पक आहे असं वाटते, अशी प्रतिक्रिया अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी येथे दिली.
सारथी संबंधातील बैठकीत गोंधळ झाल्याबद्दल विचारले असता ते म्हणाले, ”सारथी बैठकीत आज मुबंईत काय गोधळ झाला याबद्दल माहिती नाही.पण मराठा आरक्षण टिकल पाहिजे, मिळालं पाहिजे,” जेव्हा एखादा मंत्री काम करत असतो तेव्हा तो सगळ्यासाठी काम करत असतो. तो काही उणेदुणे करणार नाही. आता मंत्र्यांचे कुठे चुकते ते तुम्ही सांगितले पाहिजे. आपण जे करतो, त्यातून सर्वांना न्याय मिळाला पाहिजे, असे विजय वडेट्टीवार यांच्याबाबत बोलताना ते म्हणाले.