महाराष्ट्राला स्थिर सरकार मिळाल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांतच राज्याला कोरोनाने विळखा घातला. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढतच आहे. अशातच आता या जीवघेण्या कोरोना व्हायरसमधून महाराष्ट्राला मुक्त करण्यासाठी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आपलं मत मांडलं.
‘महाराष्ट्र या शब्दामध्येच महान राष्ट्र असा त्याचा अर्थ आहे. या राज्याला खरोखरच शोर्य, क्रिडा, कला सर्वच बाबतीत महाराष्ट्र देशात अग्रेसर राहिला आहे.’ असं छगन भुजबळ म्हणाले.
छगन भुजबळ म्हणाले की, ‘महाराष्ट्र या शब्दामध्येच महान राष्ट्र असा त्याचा अर्थ आहे. या राज्याला खरोखरच शोर्य, क्रिडा, कला सर्वच बाबतीत महाराष्ट्र देशात अग्रेसर राहिला आहे. परंतु, आपण जर परदेशात गेलो तर तिथल्या गोष्टी पाहून असं वाटतं की, आपण किती मागे आहोत. इतिहासाबाबत सर्वांना प्रेम पाहिजे, त्यासंदर्भात सगळी माहिती पाहिजे, इतिहास अंगात भिनला पाहिजे. पण इतिहासात गुरफटून राहून चालणार नाही आपल्याला.’
पुढे बोलताना ते म्हणाले की, ‘कधी असं वाटतं की, आपला देश जपान, जर्मनी सारखा का नाही? ज्यांचा इतिहास पाहिला तर, या देशांनी अनेक गोष्टी सहन केल्या. राख रांगोळी होऊनही हे देश उभे राहिले. त्यांच्याकडे अद्ययावत तंत्रज्ञान आहे. तसचं आपलं राज्यही याच देशांप्रमाणे सर्व गोष्टींनी सुसज्ज असायला हवं, असं मला वाटतं.’