कोल्हापूर: गेल्या दोन महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. आतापर्यंत परिवहनमंत्री अनिल परब यांनी आणि सरकारने प्रयत्न करूनही हा संप फोडण्यात सरकारला यश आले नाही. कर्मचाऱ्यांची पगारवाढ झालेली असतानाही एसटी कर्मचारी संप सोडून परतलेले नाहीत. संपकरी कर्मचाऱ्यांचे नेतृत्व करणाऱ्या तीन मोठ्या संघटनांनी संप मागे घेण्याची घोषणा केलेली आहे. असं असतानाही एसटी कर्मचारी थेट ऍड. गुणरत्न सदावर्ते यांच्या नेतृत्वाखाली आता संपावर आहेत. दुसऱ्या बाजूला एसटी संपाचे वकीलपत्र ऍड. गुणरत्न सदावर्ते यांच्याकडून काढून घेण्यात आले आहेत.
तुम्ही कितीही करा हल्ला, पण मजबूत आहे शिवसेनेचा किल्ला – महापौर किशोरी पेडणेकर
आता राज्यातील विरोधी पक्ष असणाऱ्या भारतीय जनता पक्षाने एसटी संपाबाबत आपली भूमिका जाहीर केली आहे. राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप जो पर्यंत मिटत नाही तो पर्यंत कोल्हापूर जिल्ह्यातील अडीच हजार एसटी कर्मचाऱ्यांची चूल पेटवण्याची जबाबदारी भारतीय जनता पक्ष घेत आहे, अशी घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी केली आहे. काल चंद्रकांत पाटील यांनी आंदोलनस्थळी जाऊन कर्मचाऱ्यांची भेट घेतली होती. यावेळी संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात शिधा वाटप करण्यात आला. हाच संदर्भ घेत चंद्रकांत पाटील यांनी संपात उरलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना शिधा देण्याची जबाबदारी भाजप घेणार असल्याचे घोषित केले आहे. हा संप लवकरात लवकर संपावा आणि कर्मचाऱ्यांनी स्वाभिमानाने कामावर जावे अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली आहे.
राजेश टोपेजी तुम्ही डॉक्टर आहात, मग इंदुरीकरांना दरवेळी का पाठीशी घालतायं? तृप्ती देसाई
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आल्यापासून हैदोस सुरु आहे. यांचे नक्कीच काही तरी होईल. अंबाबाई जागी होईल आणि काहीतरी चांगले करेल,असे साकडे देखील त्यांनी देवीला घातले आहे.
Read also:
- “चंद्रकांत पाटील हे काही राजकीय चर्चेचे केंद्रबिंदू नाहीत, त्यांच्या बोलण्याने फरक पडत नाही”; संजय राऊतांचे पाटलांना चिमटे
- “मुख्यमंत्री साहेब प्रश्न विचारायला नाही तर सोडवायला अक्कल लागते”; चित्रा वाघ यांचा ठाकरेंना सणसणीत टोला
- ठाण्यात खारेगाव रेल्वेच्या पुलाच्या कामाच्या श्रेयवादावरून राष्ट्रवादी-सेनेत जुंपली
- नागवडे सहकारी साखर कारखान्यात आमदार बबनराव पाचपुते गटाचा दारुण पराभव; राजेंद्र नागवडेंनी २१च्या २१ जागा जिंकल्या
- फडणवीसांचा एक मास्टरस्ट्रोक आणि महेश लांडगेंची गोव्यात एन्ट्री