कोल्हापूर – भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रपती राजवटीबाबत एक वक्तव्य केलं आहे. ‘महाविकास आघाडी सरकारनं राष्ट्रपती राजवट लागण्यासाठीची काहीच कारणे शिल्लक ठेवली नाहीत’, असं चंद्रकांत पाटील कोल्हापुरात माध्यमांशी बोलताना म्हणाले आहेत.राष्ट्रपती राजवाट लागण्यासाठीची काहीच कारणे राज्य सरकारने शिल्लक ठेवली नाहीत. राज्यपालांनी याबाबत दे होतंय ते होऊ दे म्हणून बाजू काढली आहे. हे सरकार मात्र राज्यपालांचे अधिकार कमी करत सुटले आहे, असा आरोप पाटील यांनी केला
हे तर दारू विकणाऱ्यांचे सरकार; देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल
राज्यपालांनी एखादा निरोप पाठवला तर तुम्ही तो नाकारता. म्हणजे राज्यपालांचा तुम्ही अपमान करता. राष्ट्रपती राजवट लावण्यासाठीची सगळी यादी पूर्ण झाली आहे. सगळी कारणं यांनी पूर्ण केली आहेत.” अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. राज्य सरकारकडून कुलगुरु पदासाठी दोन नावे राज्यपालांना पाठवली जाणार आहेत. राज्यापालांना त्यातील एक नाव निवडावे लागणार आहे. तसंच उच्च व तंत्रशिक्षण मंत्री हे प्र-कुलपती असणार आहेत. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत विद्यापीठ कायद्यातील दुरुस्तीला मंजुरी देण्यात आली आहे. त्यानुसार हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आगामी अधिवेशानात याबाबत सुधारणा विधेयक मांडले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रपती राजवटीबाबत वक्तव्य केलं आहे.
“जर माझ्या मतदारसंघाततील रस्ते हेमा मालिनी यांच्या गालासारखे नसतील तर मी राजीनामा देईन”
चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. “जे जे त्रासदायी होईल ते यांना नको आहे. तपास यंत्रणा आणि भाजपचा कोणताही संबध नाही. लोक विचार करून आपलं मत ठरवतात. कोण आजारी आहे. कोण जेलमध्ये आहे. राज्यात सगळा गोंधळच सुरू आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जनतेसमोर जा मग कळेल जनता कुणाला स्वीकारते?” असे आवाहन यावेळी चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीला केले.
Read also:
- गुलाबराव पाटलांच्या ‘त्या’ विधानावर हेमा मालिनी भडकल्या, म्हणाल्या..
- “टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणी सीबीआय चौकशी करण्यात यावी”; देवेंद्र फडणवीस यांची मागणी
- मला 50 कोटी द्या, मी घरदारासह जिल्हा सोडतो; भाजप नेत्याच भन्नाट चॅलेंज
- नगरपंचायतीच्या निवडणुकीचा नारायण राणेंना पडला विसर..
- “भाजपचे अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात”; महापौर किशोरी पेडणेकर यांचा गौप्यस्फोट