दिल्ली : सध्या राज्यातील भाजपचे पहिल्या फळीतील महत्त्वाचे नेते दिल्ली दरबारी आहेत. तसेच, भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदावरून चंद्रकांत पाटील यांची उचलबांगडी होण्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी, उद्योगमंत्री नारायण राणे यांची भेट घेतली. त्यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी, प्रदेशाध्यक्ष बदलीच्या सर्व चर्चा फेटाळून लावल्या.
भाजप प्रदेश अध्यक्ष बदलणार ? चंद्रकांत दादा चार दिवस दिल्लीत
“प्रदेशाध्यक्ष बदलाच्या सर्व चर्चा फक्त माध्यमांत आहेत. पक्षात तशी काही चर्चा नाही आणि विचारही नाही. दर ३ वर्षांनी पक्षात फेरबदल होतो. तो अगदी तळागाळातल्या पदापासून ते राष्ट्रीय अध्यक्षपदापर्यंत होत असतो”, असं सांगत त्यांनी प्रदेशाध्यक्ष बदलाच्या चर्चांना पूर्णविराम दिला. तसेच, “काँग्रेसला वर्ष झालं पक्षाध्यक्ष मिळत नाही. भाजपत तसं नाही”, असं म्हणत त्यांनी काँग्रेसवर टीका केली.
२०२४ ला आमचं एकच इंजिन असणार; देवेंद्र फडणवीस यांच मोठं विधान
यावेळी त्यांनी, “पहिल्यांदाच केंद्रात राज्याला जास्त मंत्रीपदे मिळाली आहेत. त्यामुळे राज्यातील मंत्र्यांचं अभिनंदन करण्यासाठी मी दिल्लीत आलो. त्यांचं दिल्लीत येऊन अभिनंदन करणं आवश्यक होतं. बाकी या दौऱ्यामागे काहीच राजकीय हेतू नाही”, असं स्पष्टीकरण त्यांनी दिल्ली दौऱ्यावर दिलं आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष बदलाच्या कंड्या पेटवू नका; बातम्या कमी पडल्या तर मला मागा – देवेंद्र फडणवीस
दरम्यान, फडणवीस-पाटील या दोन्ही नेत्यांनी प्रदेशाध्यक्ष पद बदलण्याच्या चर्चा माध्यांत चालू असल्याचे सांगितले असले तरी, चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद देण्याच्या हालचाली भाजपमध्ये सुरू आहेत. केंद्रात भाजपने अधिकाधिक ओबीसी नेत्यांना मंत्रिपदं दिली आहेत. त्यामुळे ओबीसी चेहरा म्हणून चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे हे पद जाणार असल्याची चर्चा आहे. आता भाजप नेमका काय निर्णय घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Read Also :
- लवकरच येईन! महिनाभरापासून राज्य सरकारचे वाभाडे काढले नाहीत, राणेंचा महाविकास आघाडीला इशारा
- भाजपत अंतर्गत कुरघोडीच्या राजकारणाने गाठले टोक, शहर भाजपची टीम दिल्ली दरबारी दाखल
- “पुण्याचा विकास फडणवीसांच्या सवडीनुसार नाही तर अजित पवारांच्या गतीने होणार”, चाकणकरांचा टोला
- मिसेस फडणवीसानंतर आता मिस्टर फडणवीस; पुणे मेट्रोच्या श्रेयासाठी मोदींच्या नावाची कुरघोडी?