पुणे : कुख्यात दहशतवादी दाऊदशी संबंधित जमीन व्यवहार केल्याप्रकरणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक सध्या तुरूंगात आहेत. विरोधी पक्षांकडून नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी सध्या जोरदार सुरू आहे. सत्ताधारी पक्षांकडून नवाब मलिक यांना समर्थन दिले जात आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण सध्या चांगलचं तापलेलं आहे. अशातच आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी उद्या मुबंईत मोर्चा काढणार असल्याचा इशारा दिला आहे.
आर्यन खान प्रकरणात शिवसेना, काँग्रेस मंत्र्यांचा समावेश; मोहित कंबोज यांचा खळबळजनक दावा
चंद्रकांत पाटील म्हणाले की, नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आमचा उद्या मुंबईत मोर्चा निघणार आहे. पोलिसांनी उद्याच्या मोर्चाला परवानगी नाही दिली तरी परवानगी झूगारून मोर्चा काढला जाईल. तसेच नवाब मलिकांचा राजीनामा घ्यावच लागेल. अशा इशारा चंद्रकांत पाटलांनी ठाकरे सरकारला दिला आहे.
गोव्याच्या रश्मी शुक्ला कोण? संजय राऊतांनी केंद्रीय यंत्रणांचे काढले वाभाडे
नवाब मलिकांचा राजीनामा महाविकास आघाडी सरकार का घेत नाही ? त्यांचा राजीनामा न घेण्याबाबत या सरकारवर कुणाचा दबाव होता का? कदाचित मलिक यांचा राजीनामा घेऊ नये म्हणून दाऊदचा दबाव असेल असा माझा अंदाज आहे. मी ज्याप्रकारे उद्धव ठाकरे यांना ओळखतो. त्यानुसार त्यांनी नवाब मलिक यांचा राजीनामा घेतला असता, परंतु त्यांच्यावर कुणाचा तरी दबाव आहे. असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.
महाराष्ट्र पॅटर्नचे जे प्रमुख होते, तेच निवडणूक काळात गोव्यात; फोन टँपिंगवरून संजय राऊतांचा टोला
नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजपकडून या अगोदर मोठ्या प्रमाणावर आंदोलने काढली आहेत. यावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये जोरदार संघर्ष देखील बघायला मिळत आहे. तसेच आगामी काही काळात महानगरपालिकेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. याचा परिणाम या निवडणुकांवर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उद्या राज्यात कोणत्या राजकीय घडामोडी घडणार ते पहाणं आता महत्वाचे ठरणार आहे.
Read also:
- ठाकरे सरकारकडून राज्यपालांना टार्गेट केले जात आहे; फडणवीसांची ठाकरे सरकारवर टीका
- संजय राऊत राष्ट्रवादीचे प्रवक्ते झाल्यापासून त्यांची ओळख, नाही तर…; गिरीश महाजनांचा टोला
- मध्यप्रदेशमधील प्रकरण टिकतयं तर, आमचंही प्रकरण टिकेल; वडेट्टीवारांची ओबीसी आरक्षणावर प्रतिक्रिया
- मग नारायण राणेंचा राजीनामा का घेतला नाही, नवाब मलिकांवरील कारवाई अयोग्य- शरद पवार
- फोन टँपिंग प्रकरणावर उपमुख्यमंत्र्याचं संजय राऊतांना प्रत्युत्तर, म्हणाले…