नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या संसदीय दलाच्या बैठकीत सर्व खासदारांना हिवाळी अधिवेशनादरम्यान सभागृहात उपस्थित राहण्याचा सल्ला दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “मी तुम्हाला नेमहीच संसदेत उपस्थित राहण्यास सांगत असतो. जेव्हा तुम्ही तुमच्या मुलांना घरातील काही काम करण्यास सांगतात आणि ते जेव्हा करत नाहीत तेव्हा तुम्हाला राग येतो. तर मग विचार करा की, माझी आणि संसदीय कार्यमंत्र्यांची काय अवस्था होत असेल. तुमच्या अनुपस्थितीमुळे आम्हाला किती वाईट वाटत असेल.”
कर्जतमध्ये महाविकास आघाडीत संभ्रम; जागा वाटपाचा तिढा काही सुटेना.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सर्व गोष्टी खासदारांसमोर ठेवत त्यांना संसदेच्या हिवाळी अधिवेशनात आणि कामकाजात सहभागी होण्यास सांगितले आहे. यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खासदारांना इशारा देत स्वत:मध्ये वेळीच बदल घडवून आणा अन्यथा परिवर्तन घडेल असंही म्हटलं आहे.
ठाकरे सरकारने भ्रष्टाचाराचे रेकॉर्ड मोडले; भाजप नेते गिरीष महाजनांचा गंभीर आरोप
भाजप संसदीय पक्षाच्या बैठकीत भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी सर्व खासदारांना संसदेत सुरू असलेल्या कामांची माहिती त्यांच्या जिल्हाध्यक्ष, मंडळ अध्यक्षांना देण्याचे निर्देश दिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांचा प्रस्ताव मान्य करत 14 नोव्हेंबरला आपल्या भागातील जिल्हाध्यक्ष आणि मंडळ अध्यक्षांसोबत चहावर चर्चा करणार असल्याचे सांगितले. खासदार क्रीडा स्पर्धेबाबत भाजपच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व खासदारांना वर्षभर क्रीडा स्पर्धा आयोजित कऱण्याचा सल्ला दिला आहे. यासोबतच स्पर्धेत विविध खेळांचा समावेश करावा असेही सांगितले आहे.
Read Also :
- पक्षप्रवेश न केल्यामुळे भाजपाने मला तुरुंगात टाकले; काँग्रेस नेत्याचा दावा
- दिलीप वळसे पाटलांची बाजी, पुणे जिल्हा बँकेच्या संचालकपदी बिनविरोध
- पवार कुटुंब ओबीसी आरक्षणाचे कर्दनकाळ; गोपीचंद पडळकरांचा हल्लाबोल
- अकोले नगरपंचातीमध्ये भाजपचीच सत्ता; वैभव पिचड यांचा दावा
- अध्यक्षपद हुकल्यानंतर शिवेंद्रराजेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…